Yogyakarta Daycare Abuse Viral Video Dainik Gomntak
ग्लोबल

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

13 Suspects Arrested Yogyakarta Police: इंडोनेशियातील योज्यकर्ता येथील एका नामांकित डेकेअर सेंटरमध्ये लहान मुलांचा अमानुष छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Manish Jadhav

Yogyakarta Daycare Abuse Viral Video: इंडोनेशियातून एक धक्कादायक घटना समोर आली. योज्यकर्ता येथे एका नामांकित डेकेअर सेंटरमध्ये लहान मुलांचा अमानुष छळ होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या घटनेचा धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत या सेंटरला कायमचे टाळे ठोकले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हेगारी तपास सुरु केला असून आतापर्यंत 13 संशयितांना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, योज्यकर्ता येथील 'लिटल अरेषा' नावाच्या डेकेअर सेंटरमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्यांना क्रूर वागणूक दिली जात होती. व्हायरल झालेल्या या फुटेजमध्ये कर्मचाऱ्यांकडून मुलांवर होणारा अत्याचार स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी 30 हून अधिक लोकांची चौकशी केली. योज्यकर्ता मेट्रो पोलीस प्रमुख इवा गुना पांडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये डेकेअर फाउंडेशनचा प्रमुख, व्यवस्थापक आणि 11 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास वेगाने सुरु आहे.

तपासादरम्यान समोर आलेली माहिती अधिकच अस्वस्थ करणारी आहे. या डेकेअर सेंटरमध्ये एकूण 103 मुले नोंदणीकृत होती, ज्यापैकी 53 मुले या अत्याचाराचे बळी ठरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही चिमुकल्यांना झोपताना त्यांचे हात-पाय बांधून ठेवले जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या. पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, मुलांचे संरक्षण करणे ही आमची प्राथमिकता असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. सध्या पीडित मुलांची वैद्यकीय तपासणी आणि मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशन केले जात आहे, जेणेकरुन या छळाची व्याप्ती पूर्णपणे स्पष्ट होईल.

जालन पाकेल येथील हे 'लिटल अरेषा' डेकेअर सेंटर आता कायमचे सील करण्यात आले. या घटनेमुळे खासगी बालसंगोपन केंद्रांच्या परवाना प्रक्रिया, कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणे आणि सीसीटीव्ही निरीक्षणाबाबत कडक कायदे करण्याची मागणी जोर धरत आहे. त्याचवेळी, इंडोनेशियातील पालक आणि बाल हक्क तज्ज्ञांनी अशा संस्थांवर सरकारच्या कडक देखरेखीची आणि कर्मचाऱ्यांसाठी कठोर प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. या प्रकरणामुळे केवळ योज्यकर्ताच नव्हे, तर संपूर्ण इंडोनेशियातील बालसुरक्षेच्या मानकांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT