Viral Stunt Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Stunt Video: पठ्ठ्यानं 'नागराजा'सोबत घेतला पंगा, जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अरे भाई, हा जिवंत आहे की गेला'?

King Cobra Stunt Viral Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात, पण नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओने मोठी खळबळ उडवून दिली.

Manish Jadhav

King Cobra Stunt Viral Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात, पण नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओने मोठी खळबळ उडवून दिली. इंडोनेशियातील प्रसिद्ध रेप्टाइल एक्सपर्ट रिम्बा पेटुआलांग याचा पुन्हा एकदा अत्यंत धोकादायक स्टंट व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रिम्बा एका महाकाय आणि अत्यंत विषारी किंग कोब्रासोबत खेळताना दिसत आहे. त्याचा हा जीवघेणा लाईव्ह शो पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांनी तोबा गर्दी केली.

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये रिम्बा मृत्यूशी खेळताना स्पष्टपणे पाहायला मिळतो. या स्टंटचा सर्वात थरारक आणि भीतीदायक भाग म्हणजे, रिम्बा त्या किंग कोब्राच्या अगदी जवळ जातो आणि त्याला किस करण्याचा प्रयत्न करतो. या महाविषारी सापाला आपल्या चेहऱ्याच्या अगदी वर फणा काढून उभे करत त्याने अत्यंत जीवघेणा खेळ केला. यादरम्यान सापाकडून छोटीशीही चूक झाली असती तर रिम्बाचा जागीच मृत्यू झाला असता. हा थरार पाहताना प्रेक्षकांचाही श्वास रोखला गेला.

दुसरीकडे, इंटरनेटवर हा व्हिडिओ येताच तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने आश्चर्य व्यक्त करत लिहिले की, अरे भाई, हा माणूस जिवंत आहे की गेला? तर दुसऱ्या एका युजरने देवाचा धावा करत लिहिले की, काय बहादुरी आहे बुवा! आम्ही असा थरार यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. तर काही युजरने मजेशीर कमेंट केली की, आजकाल किंग कोब्रा सुद्धा फारसा सिरियस राहिलेला नाही. या अंगावर काटा आणणाऱ्या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घातला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Palolem Beach Goa: पाळोळे बीचचा जगभर डंका! जगातील टॉप 25 समुद्रकिनाऱ्यांमध्ये पटकावलं सहावं स्थान; आशियातील ठरला नंबर वन बीच

Mr Indian Hacker Viral Video: 1000 रॉकेट एकाच वेळी पेटवले अन् आकाशात झाला आगीचा वर्षाव! Mr. Indian Hacker चा थरारक व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांमध्ये दोन गट

Hardik Pandya News: हार्दिक पांड्याला संघात कायम न ठेवणं मुंबईसाठी फायद्याचं! अर्शदीप-बुमराहची जोडी प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणार; आकाश चोप्राचं मोठं विधान VIDEO

VIDEO: 60 प्रवाशांनी भरलेली भरधाव बस अचानक उलटली! आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; प्रवाशांमध्ये एकच खळबळ

India U19 Semi Final Qualification: पाकिस्तानकडून पराभव, तरीही टीम इंडियासाठी सेमीफायनलचे दरवाजे खुले! UAE विरुद्धचा सामना ठरणार निर्णायक; जाणून घ्या संपूर्ण समीकरण

SCROLL FOR NEXT