Sheikh Hasina Dainik Gomantak
ग्लोबल

मोदी सरकारच्या 'या' निर्णयाने बांगलादेशच्या अडचणी वाढल्या

बांगलादेश सर्वाधिक गहू भारतातून आयात करतो

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपूर्वी भारत सरकारने गहू निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामूळे बांगलादेशच्या अडचणीत वाढ झाली आहे. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बांगलादेशने रशियाकडे मदतीचा हात मागितला आहे. भारताच्या गहू निर्यातीवरील निर्बंधांमुळे बांगलादेशला चढ्या भावाने गहू खरेदी करणे भाग पडले आहे. (Indian wheat export ban bangladesh looks to russia for cheaper wheat )

भारताच्या गव्हाच्या निर्यातीवरील बंदीमुळे शेजारील बांगलादेशसह अनेक देशांना अन्न संकटाचा सामना करावा लागत आहे. बांगलादेश पूर्वी भारताकडून आवश्यक असलेला गहू खरेदी करत असे परंतु आता बंदीमुळे त्यांना इतर पर्याय शोधावे लागत आहेत. बांगलादेशचे सरकारी आणि व्यावसायिक अधिकारी म्हणाले की बांगलादेश आता गव्हाचा पुरवठा सुरक्षित करण्यासाठी रशियाशी बोलत आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेश रशियाकडून गहू खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून इतर पर्यायांपेक्षा कमी किमतीत गहू मिळू शकेल."आम्ही सुरुवातीला रशियाकडून किमान दोन लाख टन गहू मागू," असे एका बांगलादेश च्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर रॉयटर्सला सांगितले. बांगलादेश सुमारे 7 दशलक्ष टन गहू आयात करतो आणि गेल्या वर्षी त्यातील दोन तृतीयांश पेक्षा जास्त गहू भारतातून आयात केला गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjivani Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी वेतनाविना; वित्त खात्यात फाईल प्रलंबित, 2 महिन्यांचे वेतन अडल्याने कोंडी

Goa Traffic Diversion: मेरशी येथील अटल सेतूवर जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी 25 जूनपर्यंत बंद, पर्यायी मार्ग कोणता?

Lucky Zodiac Sign: अब्जाधीश होण्याचा सुवर्णयोग! बँक बॅलन्स वाढणार अन् टेन्शन मिटणार; 20 जूनपासून 5 राशींचे नशीब पालटणार

कुडचडेतील ओहोळात अचानक माशांचा मृत्यू; कचरा प्रक्रिया प्रकल्पावर स्थानिकांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Mapusa News Food Court: ऑक्टोबरपूर्वी म्हापशात उभे राहणार अत्याधुनिक 'फूड कोर्ट'! खवय्यांसाठी पालिका प्रशासनाची मोठी भेट; कसा असणार नवा लूक?

SCROLL FOR NEXT