Sayesh Veera Dainik Gomantak
ग्लोबल

America: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या, पदव्युत्तर पदवी मिळणार होती; हल्लेखोराने...

America: अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आंध्र प्रदेशातील 24 वर्षीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

Manish Jadhav

America: अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आंध्र प्रदेशातील 24 वर्षीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. उदरनिर्वाहासाठी तो पेट्रोल पंपावर काम करत होता.

तो काम करत असलेल्या पेट्रोल पंपावर गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव सायेश वीरा असे आहे. तो आंध्र प्रदेशचा रहिवासी होता.

सायेश अमेरिकेतील ओहायो राज्यातील कोलंबस शहरातील पेट्रोल पंपावर उदरनिर्वाहासाठी काम करत होता. आता अमेरिकन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, ही घटना गुरुवारी सकाळी 12.50 वाजता (यूएस स्थानिक वेळेनुसार) फ्रँकलिंटन, कोलंबस, ओहायो येथील वेस्ट ब्रॉड स्ट्रीट येथे घडली.

त्यावेळी सायेश पेट्रोल पंपवर काम करत होता. सायेश नोव्हेंबर 2021 मध्ये अमेरिकेत (America) आला होता. गुरुवारी दुपारी एका सशस्त्र हल्लेखोराने पेट्रोल पंपावर हल्ला करुन सायेशकडे पैशांची मागणी केली होती.

सायेशच्या काकाने सांगितले की, "त्याने या हल्लेखोरांचा प्रतिकार केला असता, हल्लेखोरांनी पैसे लुटण्यापूर्वी त्याच्यावर गोळ्या झाडल्या."

पोलिसांनी मारेकऱ्याचा फोटो जारी केला

स्थानिकांनी सांगितले की, सायेशला ताबडतोब रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले, मात्र काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, कोलंबस पोलिसांनी संशयिताचा फोटो जारी केला आहे.

विशेष म्हणजे, त्यांनी हल्लेखोरासंबंधी माहिती शेअर करण्याचे आवाहन केले आहे. सध्या अमेरिकन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

यासोबतच मृत सायेशच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती आधीच देण्यात आली आहे. सायेश वीराचे पार्थिव लवकरच त्याच्या गावी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT