Indian Student in America Dainik Gomantak
ग्लोबल

Indian Student in America: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण, सात महिने ठेवले ओलीस; अन्...

Indian Student in America: अमेरिकेतील मिसूरी पोलिसांनी 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

Manish Jadhav

Indian Student in America: अमेरिकेतील मिसूरी पोलिसांनी 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. पीडित विद्यार्थी अमेरिकेतील रोला येथील मिसूरी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये शिकण्यासाठी भारतातून अमेरिकेत गेला होता. जखमी विद्यार्थ्याला चांगल्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

चुलत भावाने मला ओलीस ठेवले

मिळालेल्या माहितीनुसार, ज्याने जखमी विद्यार्थ्याला ओलीस ठेवले तो दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा चुलत भाऊ होता ज्याने इतर दोन लोकांसह त्याला सात महिन्यांहून अधिक काळ ओलीस ठेवले होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, या घटनेची माहिती एका 'संबंधित नागरिकाने' दिली आहे.

पोलीस काय म्हणाले?

पोलिसांनी सांगितले की, त्याला शौचालयालाही जाऊ दिले नाही, मारहाण केली गेली आणि तीन घरांमध्ये काम करण्यास भाग पाडले गेले. व्यंकटेश आर सत्तारु (35) (मुख्य संशयित आणि भारतीय विद्यार्थ्याचा चुलत भाऊ), श्रवण वर्मा पेनुमेचा (23) आणि निखिल वर्मा पेनुमेचा (27) अशी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांवर मानवी तस्करी, अपहरण आणि प्राणघातक हल्ला असे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी पुढे सांगितले की, एप्रिलच्या सुरुवातीला विद्यार्थ्याला सत्तारुच्या घरी नेण्यात आले आणि सत्तारुच्या आयटी कंपनीसाठी दिवसभर काम करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर या विद्यार्थ्याला इतर लोकही मारहाण करत असे, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

तक्रारीत काय म्हटले आहे?

आरोपांमध्ये असे म्हटले आहे की, सात महिन्यांहून अधिक काळ आरोपींनी विद्यार्थ्याला तळघरात बंद केले आणि त्याला बाथरुम वापरण्याची परवानगीही दिली नाही. अधिक तपशील देताना, पोलिसांनी या घटनेचे वर्णन “एकदम अमानवीय आणि मूर्खपणाचे” असे केले. मात्र, विद्यार्थ्याने कसा तरी जीव वाचवत संधी साधून पळ काढण्यात यश मिळवले. यानंतर पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT