Indian Government has suspended visa services in Canada for now. Dainik Gomantak
ग्लोबल

कॅनडाच्या नागरिकांना भारतात 'नो एन्ट्री', सरकारने बंद केली व्हिसा सर्व्हिस

India-Canada: कॅनडातील वाढत्या भारतविरोधी कारवाया, द्वेषपूर्ण गुन्हे आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तेथे राहणाऱ्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायजरीत म्हटले आहे.

Ashutosh Masgaunde

Indian Government has suspended visa services in Canada for now:

भारत आणि कॅनडामधील संबंध सातत्याने बिघडत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये दरी सातत्याने वाढत आहे.

या प्रकरणात आता भारताने कॅनडामधील व्हिसा सेवा सध्या स्थगित केली आहे. आता कॅनडाच्या नागरिकांना भारतात यायचे असेल तर त्यांना व्हिसा मिळणार नाही.

कॅनडामधील इंडियन व्हिसा सर्व्हिसेसच्या पोर्टलवर एक सूचना प्रकाशित करण्यात आली आहे. भारतीय मिशन्सना संबोधित करताना असे सांगण्यात आले की, ऑपरेशनल कारणांमुळे पुढील आदेश येईपर्यंत भारतीय व्हिसा जारी करण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

उल्लेखनीय आहे की, एक दिवसापूर्वी, खलिस्तान समर्थक संघटना शिख फॉर जस्टिस (SFJ) च्या धमकीनंतर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडामध्ये राहणारे भारतीय आणि तेथे शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी काही सूचना जारी केल्या होत्या.

याआधी कॅनडा सरकारने भारतात राहणाऱ्या नागरिकांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी केली होती. यानंतर भारतानेही बुधवारी कॅनडात राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी केली. त्यामध्ये, कॅनडातील वाढत्या भारतविरोधी कारवाया, द्वेषपूर्ण गुन्हे आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तेथे राहणाऱ्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी, असे म्हटले आहे.

ज्या भागात यापूर्वी भारतविरोधी कारवाया झाल्या आहेत, त्या भागात जाणे त्यांनी टाळावे. सर्व भारतीयांनी, विशेषत: विद्यार्थ्यांनी, ओटावा येथील उच्चायुक्तालय आणि टोरंटो आणि व्हँकुव्हर येथील भारतीय वाणिज्य दूतावासात आपली नोंदणी करावी.

काही दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत भारताविषयी केलेल्या वक्तव्यानंतर हा संपूर्ण वाद सुरू झाला.

ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी भारताच्या भूमिकेचा उल्लेख केला होता. कॅनडाने एका भारतीय राजनैतिकाला देश सोडण्यास सांगितले होते. यानंतर भारताने कॅनडाच्या एका मुत्सद्द्यालाही देश सोडण्यास सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

SCROLL FOR NEXT