New Youtube CEO Neal Mohan Dainik Gomantak
ग्लोबल

Youtube CEO: अभिमानास्पद! भारतीय वंशाचे नील मोहन होणार यूट्यूबचे नवे सीईओ

गेल्या नऊ वर्षांपासून जागतिक ऑनलाइन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान डियान वोजिकी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Pramod Yadav

New Youtube CEO Neal Mohan: भारतीय वंशाचे नील मोहन (Neal Mohan) आता यूट्यूबचे नवे सीईओ होणार आहेत. सुसान वोजिकी यांच्या जागी मोहन विराजमान होतील. गेल्या नऊ वर्षांपासून जागतिक ऑनलाइन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान डियान वोजिकी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी, 16 फेब्रुवारी रोजी याबाबत माहिती दिली आहे. "माझे कुटुंब, आरोग्य आणि वैयक्तिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आता माझ्यासाठी महत्वाचे आहे. मी YouTube सोडत आहे." असे YouTube कर्मचार्‍यांना पाठवलेल्या पत्रात, सुसान वोजिकी म्हणाल्या आहेत.

सुंदर पिचाई हे Google आणि YouTube च्या मूळ कंपनी अल्फाबेटचे CEO देखील आहेत. YouTube हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. नील मोहन युट्युबच्या वरिष्ठ उपाध्यक्षाची भूमिकाही पार पाडणार आहेत.

नील मोहन सध्या YouTube चे मुख्य उत्पादन अधिकारी आहेत. नोव्हेंबर 2015 मध्ये त्यांनी यूट्यूबमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, नील मोहनने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून एमबीए केले आहे आणि त्यांनी एक्स्चेंज कंपनीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.

अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "सुसानने एक विलक्षण टी तयार केली आहे आणि नीलमध्ये नवा उत्तराधिकारी सापडला आहे. नील YouTube च्या यशाच्या पुढील दशकात नेतृत्व करण्यास सक्षम आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT