Sri Lanka Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: श्रीलंका संकटावर भारताची पहिली प्रतिक्रिया, परराष्ट्र मंत्री म्हणाले...

Sri Lanka Crisis: भारताने श्रीलंकेच्या पाठीशी उभे असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

आर्थिक संकट आणि जनक्षोभाचा सामना करणार्‍या श्रीलंकेतील परिस्थिती बिकट होत चालली आहे. महागाई शिगेला पोहोचल्याने आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. जनतेचा रोष इतका वाढला आहे की त्यांनी शनिवारी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आणि पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावली. आर्थिक संकटामुळे गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर उभा असलेला श्रीलंकेचा मित्र भारत आज पुन्हा त्याच्या पाठीशी उभा आहे. (Sri Lanka Crisis News)

आर्थिक अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला भारताने आश्वासन दिले आहे. आम्ही यापूर्वीही पाठिंबा दिला होता आणि आजही आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, आम्ही सर्व शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नेहमीच मदत करत आलो आहोत. जयशंकर म्हणाले की, श्रीलंकेत सध्या निर्वासितांचे कोणतेही संकट नाही. श्रीलंकेतील भारताच्या उच्चायुक्तांनी एक निवेदन दिले आहे. या विषम परिस्थितीतही भारत आपल्या मैत्रीचे कर्तव्य पार पाडेल आणि आज आम्ही श्रीलंकेच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत.

कोणत्याही देशाने मदतीचा हात पुढे केला नाही

आर्थिक संकट आणि हिंसक निदर्शनांनंतरही, जगातील कोणत्याही देशाने श्रीलंकेला (Sri Lanka) मदतीचा हात पुढे केला नाही. जिथे भारताने (India) मोठे मन दाखवले आणि ते शक्य ते सर्व मदत करत असल्याचे सांगितले.

एक एक करून सर्व कॅबिनेट मंत्री राजीनामे देतील
शनिवारपासून सुरू असलेल्या निदर्शनांनंतर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे. आता विक्रम सिंघे यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री एक एक करून राजीनामे देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आपला राजीनामा सादर करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT