TS Tirumurti Dainik Gomantak
ग्लोबल

भारताने पाकिस्ताच्या पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले

दहशतवादी ओसामा बिन लादेनला संयुक्त राष्ट्रांमध्ये शहीद म्हटल्याबद्दल भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले आहे.

दैनिक गोमन्तक

दहशतवादी ओसामा बिन लादेनला (Osama bin Laden) संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) शहीद म्हटल्याबद्दल भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांना फटकारले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले आहेत की, पाकिस्तानने (Pakistan) सीमेवर दहशतवादाला प्रोत्साहन दिले आहे. 2008 चे मुंबई आणि 2016 मध्ये पठाणकोट येथे झालेले मोठे दहशतवादी हल्ले कधीही विसरु शतक नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारनाम्यांची भारताला मोठी किंमत चुकवावी लागली आहे, असे ते यावेळी म्हणाले. दहशतवादासाठी किती मानवी किंमत मोजावी लागते याची भारताला पूर्ण पणे जाणीव आहे.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती (TS Tirumurti) पुढे म्हणाले की, दहशतवादी हल्ल्यातील दोषींना न्याय देण्यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद संपूर्ण जगाच्या शांतता आणि सुरक्षेला धोका आहे. टीएस तिरुमूर्ती म्हणाले की, 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर जवळपास 20 वर्षांनंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ओसामा बिन लादेनचा शहीद म्हणून बचाव करत आहेत हे आपण विसरू नये. या दहशतवादी हल्ल्यांचा त्यांना आतापर्यंत कोणताही पश्चाताप झालेला नाही.

टीएस तिरुमूर्ती म्हणाले की, आम्ही आमच्या शेजारील देशात दहशतवादाचा धोका सतत उघड करत असतो. अफगाणिस्तानातील (Afghanistan) बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे सुरक्षे संबंधीत भीती देखील वाढली आहे. आज दहशतवादी आयसीटी, सोशल मीडिया, डिजिटल पेमेंट पद्धती, एनक्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिसेस, क्रिप्टोकरन्सी आणि मानवरहित विमान प्रणाली यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, ज्याचा वापर जगभरात केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

SCROLL FOR NEXT