China Corona Latest News Dainik Gomantak
ग्लोबल

China Corona : चीनमध्ये पुन्हा कोरोनामुळे हाहाकार! केवळ एका महिन्यात 'इतके' मृत्यू...

तब्बल 90 कोटी नागरीकांना कोरोनाचा संसर्ग

Akshay Nirmale

China Corona : चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्याने भारत, जपान आणि अमेरिकेसारख्या देशांमध्येही नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, झिरो कोविड पॉलिसी हटवल्यानंतर चीनने प्रथमच कोरोनामुळे मृत्यूची अधिकृत आकडेवारी जाहीर केली. चीनच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार 8 डिसेंबर ते 12 जानेवारीपर्यंत 60 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. यात बहुतांश लोक 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते.

चीनच्या पेकिंग विद्यापीठाच्या संशोधनानुसार, 11 जानेवारीपर्यंत देशातील 64% लोकसंख्येला म्हणजेच 90 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की गान्सू प्रांताची 91% लोकसंख्या, हेनान प्रांताची 89% लोकसंख्या, युनानची 84% लोकसंख्या आणि किंघाई प्रांताची 80% लोकसंख्या संक्रमित आहे.

चीनने 8 जानेवारी रोजी तीन वर्षांपासून बंद असलेल्या सर्व सीमा उघडल्या. तेव्हापासून 4 लाखांहून अधिक लोक चीनमध्ये आले आणि तेथून इतर देशांमध्ये गेले. क्वारंटाईनही रद्द केले. चीनमध्ये 8 जानेवारी ते 12 जानेवारी या काळात 4 लाख 90 हजार एंट्री आणि एक्झिट ट्रिप झाल्या. त्यापैकी 2 लाख 50 हजार लोक चीनमध्ये आले आणि 2 लाख 40 हजार लोक चीनमधून इतर देशांत गेले.

चीनचे आरोग्य तज्ज्ञ जेंग गुआंग यांनी दावा केला आहे की, कोरोनाचा उच्चांक 2 ते 3 महिने राहील. चीनमधील कोरोनाविरुद्धची लढाई आतापर्यंत शहरांवर केंद्रित होती, पण आता चीनमधील गावांकडेही लक्ष देण्याची वेळ आली आहे. नवर्षात चीनी लोक गावी जातात, गावात वेळ घालवतात. शहरांतील लोक कोरोनाला खेड्यापाड्यात घेऊन जातील. तेथे आरोग्य सेवा मिळत नसल्याने परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. चीनमध्ये 21 जानेवारीपासून सुरू होणार्‍या नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे गावात कोरोना मोठ्या प्रमाणात पसरू शकतो.

या देशात चीनी प्रवाशांवर निर्बंध

स्वीडन, जर्मनी, मलेशिया, कतार, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मोरोक्को, फ्रान्स, ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जपान, इस्रायल, भारत, इटली आणि दक्षिण कोरिया या देशांनी चीनी प्रवाशांना निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट सक्तीचा केला आहे. मोरोक्कोने आधीच चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. तैवानने चीनमधून येणाऱ्यांसाठी कोविड चाचणी अनिवार्य केली आहे. पाकिस्तान आणि फिलिपाइन्सही चीनी प्रवाशांवर नजर ठेवत आहेत. तर थायलंड आणि न्यूझीलंडने कोणतेही निर्बंध लादण्यास नकार दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona Mega Housing Project: देळेत गृहनिर्माण प्रकल्पाला तीव्र विरोध; 15 दिवसांत निर्णय न घेतल्‍यास उपोषणाचा इशारा

Hardik Pandya New Look: हार्दिक पंड्याचा नवा अवतार चर्चेत; मुंडण करून महिका शर्मासोबत श्री वेंकटेश्वर स्वामींच्या चरणी नतमस्तक Watch Video

Santa Cruz BJP Office: बाबूश-रुडॉल्फमध्ये शब्दयुद्ध! सांताक्रुझमधील नवे कार्यालयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू

खरी कुजबूज: तिकीट अन् राजकीय चर्चा..!

US Shopping Mall Shooting: अमेरिकेत शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार; तिघांचा मृत्यू, पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर ठार Watch Video

SCROLL FOR NEXT