Afghan Women Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan: महिलांना हिजाब घालणं झालं बंधनकारक, तालिबानने काढला फर्मान

तालिबानच्या धार्मिक नेत्यांनी राजधानी काबूलभोवती (Kabul) पोस्टर लावले आहेत, ज्यामध्ये अफगाण महिलांना हिजाब घालण्याचे (Afghan Women Cover Up) आदेश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानध्ये तालिबानची राजवट आल्यापासून अफगाण जनतेवर दिवसेंदिवस निर्बंध वाढत चालले आहेत. यातच आता तालिबानच्या धार्मिक नेत्यांनी राजधानी काबूलभोवती (Kabul) पोस्टर लावले आहेत, ज्यामध्ये अफगाण महिलांना हिजाब घालण्याचे (Afghan Women Cover Up) आदेश देण्यात आले आहेत. तालिबानी अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. महिलांवर लादण्यात आलेल्या नवीन निर्बंधांपैकी हा निर्बंध आहे.

तालिबानच्या (Taliban) 'प्रोमोशन ऑफ वर्च्यु अँड प्रिव्हेंशन ऑफ वाइस' या संघटनेने शहरातील कॅफे आणि दुकानांमध्ये ही पोस्टर्स लावली आहेत. यामध्ये एक महिला बुरख्याने चेहरा झाकताना दिसत आहे. ऑगस्टमध्ये सत्तेत परत आल्यापासून तालिबानने महिला आणि मुलींच्या स्वातंत्र्यावर झपाट्याने कपात केली आहे.

पोस्टरमध्ये म्हटलं आहे की, "शरिया कायद्यानुसार, मुस्लिम महिलांनी हिजाब परिधान करणे आवश्यक आहे." तालिबानच्या इस्लामिक कायद्याचे अर्थ लावण्यासाठी जबाबदार असलेल्या मंत्रालय जबाबदार आहे. सादिक आकीफ मुहाजिर म्हणाले, 'जर कोणी त्याचे पालन केले नाही तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला शिक्षा होईल किंवा मारहाण केली जाईल. हे फक्त मुस्लिम महिलांना शरिया कायद्याचे पालन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आहे.' काबूलमध्ये महिला आधीच स्कार्फने केस झाकतात. तर काही महिला पाश्चात्य कपडे देखील घालतात.

तालिबानच्या निर्णयावर महिला काय म्हणाल्या?

महिलांनी राजधानीबाहेर बुरखा घालणे सामान्य आहे. 1990 च्या दशकात पहिल्या तालिबान राजवटीत बुरखा घालणे अनिवार्य करण्यात आले होते. विद्यापीठातील विद्यार्थिनी आणि महिला हक्कासाठी लढणाऱ्या वकिलांनी एएफपीला सांगितले. मी पहिल्यांदा पोस्टर्स पाहिल्यावर मी खरोखर घाबरलो होतो, मला वाटले की कदाचित (Taliban) मला मारहाण करतील. मी बुरखा घालावा अशी त्यांची इच्छा आहे, परंतु मी असे कधीच करणार नाही.'' असंही इतर महिलांनी सांगितले.

राष्ट्रीय धोरणांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही

तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी यासाठी तालिबानी नेते तळमळत आहे. त्याच वेळी, सत्तेवर परतल्यापासून, तालिबानने राष्ट्रीय धोरणे लागू करण्यापासून काहीशी फारकत घेतली आहे. त्याऐवजी, त्यांनी स्त्री आणि पुरुषांसाठी मार्गदर्शिका प्रकाशित केली आहे, ज्यामध्ये लागू करण्यात आलेले नियम प्रांतानुसार भिन्न-भिन्न आहेत. जरी अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानचे कट्टरपंथी शासन अंमलात आल्यानंतर अनेक कठोर निर्बध लागू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 1996 ते 2001 पर्यंत अफगाणिस्तानात सत्तेत असताना त्यांनी महिलांना नोकऱ्यांपासून दूर ठेवले आणि मुलींच्या शाळा बंद केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

SCROLL FOR NEXT