Imran Khan Twitter/@ANI
ग्लोबल

Imran Khan: हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी जनतेला केले संबोधित, 'सध्याचं सरकार...'

Imran Khan: वजिराबादमधील अल्लाह हो चौकाजवळ PTI अध्यक्ष इम्रान खान यांच्या कंटेनरवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.

दैनिक गोमन्तक

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. आपल्यावर हल्ला होणार असल्याच्या एक दिवस आधी आपल्याला याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयामधून देशवासीयांना संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, 'माझ्यावर हल्ला होणार हे मला एक दिवस आधी कळले होते. माझ्या पायाला चार गोळ्या लागल्या आहेत.'

दरम्यान, गुरुवारी पंजाब (Punjab) प्रांतातील वजिराबाद येथे निषेध मोर्चा दरम्यान इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. आपल्या भाषणादरम्यान इम्रान म्हणाले की, "मी हल्ल्याचा तपशील नंतर देईन. पण मला हल्ल्याच्या एक दिवस आधी समजले की, त्यांनी मला वजिराबादमध्ये ठार मारण्याची योजना आखली होती."

दुसरीकडे, पीटीआयचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांनी आपल्या भाषणात पीएमएल-एन आणि पीपीपीवर निशाणा साधला. दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार (Corruption) करुन देशाचे कर्ज वाढवले, असे ते म्हणाले. एनआरओच्या माध्यमातून दोन्ही पक्षांच्या नेत्यांना दिलासा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT