Vaccination Dainik Gomantak
ग्लोबल

कोरोना लसीकरणाच्या आधी Painkillers घेत असाल तर...

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) वाढत असताना दुसरीकडे कोरोना लसीचे साईड इफेक्ट होऊ नये म्हणून लस घेण्याआगोदर पेनकिलर्स (Painkillers) घेऊ नका असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) दिला आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) वाढत असताना दुसरीकडे कोरोना लसीचे साईड इफेक्ट होऊ नये म्हणून लस घेण्याआगोदर पेनकिलर्स (Painkillers) घेऊ नका असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) दिला आहे. कोरोनाची लस घेण्याआधी पेनकिलर्स खाल्ल्यास त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटले आहे. मात्र त्याचवेळी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर जाणवणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी पेनकिलर्स घेतल्यास हरकत नाही असंही WHO ने म्हटले आहे.

कोरोना लसीकरणानंतर जाणवत असणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी पॅरासिटामोल (Paracetamol) किंवा इतर पेनकिलर्स घेतल्यास हरकत नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केले आहे. ताप, अंगदुखी, डोकेदुखी किंवा स्नायू दुखणे यासारख्या पोस्ट व्हॅक्सिनेशन (Vaccination) परिणामावर उपचार म्हणून पॅरासिटमोल आणि इतर पेनकिलर्सही घेऊ शकता, असे जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितल्यास युरोन्यूजनं म्हटले आहे.

कोरोना लसीकरणाच्या विपरित परिणामासंदर्भात सोशल मिडियावर अनेक चुकीच्या बातम्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. लसीचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी लस घेण्याआधी पेनकिलर्स घेतल्याने फायदा होतो असा दावा करणाऱ्या सोशल मिडियावर पोस्ट खोट्या असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या स्पष्टीकरणानंतर स्पष्ट झाले आहे.

कोरोनाची लस घेण्याआगोदर विपरित परिणाम टाळण्यासाठी पॅरासिटमोलसारख्या पेनकिलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोळ्याचं सेवन करणं योग्य नाही. पेनकिलर्सचा कोरोनाच्या लसीवर परिणाम होतो किंवा नाही हे काही ठामपणे सांगता येत नसलं तरी त्याचा कोणत्याही स्वरुपाचा परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. लसीकरणानंतर ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे यासारख्या विपरित परिणामावर पॅरासिटमोल किंवा इतर पेनकिलर घेता येईल, असंही जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

विपरित परिणामाच्या भीतीसोबत आधिपासून काही औषध घेत असणाऱ्यांनी कोरोना लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, असंही तज्ञांनी सांगितले आहे. कोरोना लसीकरणाच्या आधि किंवा नंतर कोणत्या गोळ्या घ्याव्या यासंबंधी डॉक्टरांचा (doctor) सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना Good News कधी? 7 महिने उलटले तरी पगारवाढ नाही; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

SCROLL FOR NEXT