Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबान्यांना संयुक्त राष्ट्रात बोलण्याची संधी दिली असती तर...

अशा परिस्थितीत, तालिबानला (Taliban) संयुक्त राष्ट्राच्या महासभेत (UNGA) समाविष्ट करण्याबाबत पाकिस्तान आणि चीनची चाल पुन्हा एकदा अपयशी ठरली असल्याचे मानले जात आहे.

दैनिक गोमन्तक

संयुक्त राष्ट्रामध्ये (United Nation) तालिबानबाबत (Taliban) पाकिस्तान आणि चीनची योजना फोल ठरली आहे. जर तालिबानला संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर बोलण्याची संधी देण्यात आली असती तर त्याचा थेट अर्थ असा झाला असता की, तालिबानला संपूर्ण जगाने (World Community) मान्यता दिली असे होईल. त्यामुळे पाश्चात्य देश (Western Country) या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, तालिबानला संयुक्त राष्ट्राच्या महासभेत (UNGA) समाविष्ट करण्याबाबत पाकिस्तान आणि चीनची चाल पुन्हा एकदा अपयशी ठरली असल्याचे मानले जात आहे. संयुक्त राष्ट्रातील अफगाणिस्तानच्या राजनयिक मिशनवर अपदस्थ अशरफ घनी सरकारच्या प्रतिनिधीला मान्यता देण्यात आली आहे. एवढेच नाही तर अफगाणिस्तानचे राजदूत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या सत्रातही सहभागी झाले होते.

काय होते संपूर्ण प्रकरण?

15 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांना सध्याचे अफगाणिस्तानचे राजदूत गुलाम इसकझाई यांचे एक पत्र मिळाले, ज्यात त्यांनी आग्रह धरला होता की, ते आणि त्यांच्या टीमचे इतर सदस्य महासभेच्या बैठकीत अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करतील. यानंतर, 20 सप्टेंबर रोजी तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही महासचिव महासभेच्या बैठकीत भाग घेण्याची परवानगी मागण्यासाठी एक पत्र लिहिले.

अफगाणिस्तान 27 सप्टेंबरला महासभेला संबोधित करणार असून तोपर्यंत समिती तालिबानला मान्यता देईल अशी आशा काही नाही. त्याचवेळी, भारत सातत्याने मागणी करत आहे की, अफगाणिस्तानच्या मागील सरकारच्या प्रतिनिधीलाच 27 सप्टेंबर रोजी देशाचे प्रतिनिधित्व करण्याची परवानगी द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT