IBM Layoffs Dainik Gomantak
ग्लोबल

IBM Layoffs: आयबीएम करणार मोठी नोकर कपात; 7 मिनिटांच्या बैठकीत निर्णय

IBM LayOff Detail News in Marathi: गतवर्षीप्रमाणे यावर्षीही जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढत आहेत.

Manish Jadhav

IBM LayOff News:

गतवर्षीप्रमाणे यावर्षीही जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी IBM ने आता कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. सीएनबीसीच्या अहवालानुसार, कंपनी आपल्या मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करेल. आयबीएमने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वर आपले लक्ष केंद्रित करत असताना हा निर्णय घेतला आहे.

प्रभावित कर्मचाऱ्यांची संख्या माहित नाही

दरम्यान, कर्मचाऱ्यांची (Employees) संख्या कमी करण्याबाबतची माहिती आयबीएमचे मुख्य संपर्क अधिकारी (सीसीओ) जोनाथन अदाशेक यांनी कर्मचाऱ्यांसोबत 7 मिनिटांच्या बैठकीत दिली. तथापि, कपातीची घोषणा करताना, जोनाथन यांनी या कपातीअंतर्गत कंपनी किती कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करेल हे उघड केलेले नाही. यावर्षी जानेवारीमध्येच IBM ने सांगितले होते की, ते सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत आहे.

त्यामुळे यंदा अनेक कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले

टाळेबंदीचा मागोवा घेणारी वेबसाइट लेऑफ्सनुसार, यावर्षी 1 जानेवारी ते 13 मार्च दरम्यान, जगभरातील 204 कंपन्यांनी 49,978 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. यावर्षी टाळेबंदी करणाऱ्या या कंपन्यांमध्ये Cisco, Mozilla, Amazon आणि Indigo यासह इतर अनेक मोठ्या कंपन्यांची नावे आहेत. सिस्कोने 4,200 हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली आहे. स्नॅपने 500 नोकऱ्या कमी करण्याचा निर्णयही घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT