Hurricanes Dainik Gomantak
ग्लोबल

Video: चक्रीवादळामुळे अमेरिकेत दाणादाण; विमानतळ, महामार्गही बंद

अमेरिकेतील (America) टेक्सास आणि ओक्लाहोमाला चक्रीवादळाचा (Tornado) मोठा तडाखा बसला आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेतील (America) टेक्सास (Texas) आणि ओक्लाहोमाला चक्रीवादळाचा (Tornado) मोठा तडाखा बसला आहे. या वादळात झाडे उन्मळून पडली असून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हे वादळ इतके जोरदार होते की, महामार्ग (Highway) आणि विमानतळही (Airport) बंद करावे लागले आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, चक्रीवादळामुळे (Hurricanes) वादळ निर्माण झाले असून ते पुढील काही दिवस कायम राहू शकते. मोडकळीस आलेली घरे आणि रस्त्यांवर पसरलेल्या ढिगाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. (Hurricanes have caused damage in Texas and Oklahoma in the United States)

दरम्यान, PowerOutage.us, जे यूएस मधील युटिलिटीजमधून डेटा संकलित करते. या वादळामुळे 45,000 लोकांना अंधारात रहावे लागले आहे. हे चक्रीवादळ लुलिंग टाउन आणि जॅक्सब्रो, टेक्सासमधील राउंड रॉक्स आणि ओक्लाहोमामधील किंग्स्टनमध्ये नोंदवले गेले आहेत. यूएस राष्ट्रीय हवामान विभागाने (NWS) या चक्रीवादळातून आणखी काही चक्रीवादळे निर्माण होऊ शकतात, असा इशारा दिला होता.

तसेच, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये वादळाच्या मध्यभागी एक ट्रक अडकलेला दिसत आहे. एका यूजरने त्याच्या वॉर्डरोबमधला फोटो शेअर केला आहे. या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'चक्रीवादळाचा सायरन म्हणजे कपाटातील पार्टीची वेळ.'

शिवाय, काही यूएस नेटवर्क्सवर ड्रोन फुटेज जारी करण्यात आले आहेत. ज्यामध्ये वादळ ज्या शहरांमधून गेले त्या शहरांचे नुकसान दर्शवित आहे. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्टिनजवळील एल्गिनमध्ये एक घराचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जवळच एक 18 चाकी ट्रक उलटलेला आढळून आला आहे. Weather.com नुसार, वसंत ऋतूमध्ये चक्रीवादळाचा धोका आहे. या भागातील हवामानाच्या अंदाजानुसार, चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहू शकते. त्याचबरोबर अती मुसळधार पावसामुळे पूरही येऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT