Hindu Population Dainik Gomantak
ग्लोबल

Australia Census: हिंदू लोकसंख्येमध्ये झपाट्याने होतेय वाढ

ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू आणि मुस्लिम धर्म मानणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

दैनिक गोमन्तक

Australia Census: ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू आणि मुस्लिम धर्म मानणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, देशातील ख्रिश्चन लोकसंख्या 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. याशिवाय नास्तिकांची संख्या 39 टक्के असून गेल्या 5 वर्षांत 9 टक्क्यांनी वाढली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये दर 5 वर्षांनी जनगणना केली जाते.

आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 25.55 दशलक्ष झाली आहे, जी 2016 मध्ये 2.34 दशलक्ष होती. अशाप्रकारे गेल्या 5 वर्षांत देशाची लोकसंख्या 21 लाखांनी वाढली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच ख्रिश्चन (Christian) लोकसंख्येत 50 टक्क्यांनी घट झाली आहे. आता फक्त 44% ख्रिश्चन ऑस्ट्रेलियात राहिले आहेत. तर 50 वर्षांपूर्वी हा आकडा 90 टक्के होता. यानंतरही देशात ख्रिश्चन धर्म मानणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले 39 टक्के लोक कोणत्याही धर्माला मानत नाहीत. ऑस्ट्रेलिया हा जगातील अशा देशांपैकी आहे, जिथे एकूण लोकसंख्येमध्ये नास्तिकांची टक्केवारी अधिक आहे.

हिंदू धर्म मानणाऱ्यांच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ

इतकचं नव्हे तर ऑस्ट्रेलियात (Australia) हिंदू (Hindu) आणि इस्लाम धर्मही वेगाने वाढताना दिसत आहेत. त्यानंतरही दोन्ही धर्मांचे पालन करणाऱ्यांची संख्या केवळ 3-3 टक्के आहे. परंतु गेल्या जनगणनेशी तुलना केल्यास दोन्ही धर्माची लोकसंख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू लोकसंख्या (1.9%) आणि मुस्लिम लोकसंख्या (2.6%) होती. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियात हिंदूंच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याचे कारण भारतासह जगभरातून ऑस्ट्रेलियात स्थलांतरित होणाऱ्या हिंदूंची संख्या झपाट्याने वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT