California Schools To Introduce Hindi In Curriculum Dainik Gomantak
ग्लोबल

America: आता कॅलिफोर्नियातही शिकवली जाणार 'हिंदी'; सरकारी शाळांमध्ये जागतिक भाषा म्हणून होणार समाविष्ट!

California Schools To Introduce Hindi In Curriculum: दोन सरकारी शाळा पहिल्यांदाच त्यांच्या अभ्यासक्रमात जागतिक भाषा म्हणून हिंदीचा समावेश करणार आहेत.

Manish Jadhav

California Schools To Introduce Hindi In Curriculum: अमेरिकेतील 'सिलिकॉन व्हॅली' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅलिफोर्नियातील दोन सरकारी शाळा पहिल्यांदाच त्यांच्या अभ्यासक्रमात जागतिक भाषा म्हणून हिंदीचा समावेश करणार आहेत. यानंतर विद्यार्थ्यांना ऐच्छिक विषयात हिंदीचा पर्यायही मिळेल.

दरम्यान, फ्रिमोंट येथे राहणाऱ्या भारतीय-अमेरिकन समुदायाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. शाळांमध्ये मुलांनाही हिंदी शिकवली जावी, अशी या समुदयाची अनेक दिवसांपासून मागणी होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, फ्रिमोंट हे कॅलिफोर्नियाचे क्षेत्र आहे, जिथे भारतीय-अमेरिकन नागरिकांची उपस्थिती सर्वाधिक आहे. 17 जानेवारी रोजी, फ्रिमोंट युनिफाइड स्कूल डिस्ट्रिक्ट (FUSD) बोर्डाने दोन शाळांमध्ये या संदर्भात एक पथदर्शी कार्यक्रम सुरु करण्यासाठी मतदान केले. हा प्रस्ताव 4-1 अशा फरकाने मान्य करण्यात आला.

दुसरीकडे, बैठकीदरम्यान, FUSD मंडळाचे सदस्य विवेक प्रसाद, शेरॉन कोको, लॅरी स्वीनी आणि अध्यक्ष याजिंग झांग यांनी या प्रस्तावाला जोरदार पाठिंबा दर्शवला आणि त्यांच्या निर्णयात विद्यार्थ्यांचे कल्याण हा प्रमुख घटक असल्याचे नमूद केले, असे मीडिया रिलीजमध्ये म्हटले आहे. आता हॉर्नर मिडल स्कूल आणि इरव्हिंग्टन हायस्कूलमध्ये ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या 2024-24 अध्यापन सत्रातही हिंदीचा समावेश केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT