Women Dainik Gomantak
ग्लोबल

Pok मध्ये तालिबानी फर्मान, महिला शिक्षक, विद्यार्थिनींना हिजाब घालणे केले बंधनकारक

पीओके सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

Pramod Yadav

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या नेतृत्वाखालील सरकारने पाकव्याप्त काश्मीरमधील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनी आणि महिला शिक्षकांसाठी हिजाब अनिवार्य केला आहे. पीओके सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

(Hijab mandatory for female students & teachers in PoK)

अधिसूचनेनुसार, सह-शैक्षणिक संस्थांमध्ये महिला विद्यार्थिनी आणि शिक्षकांना हिजाब घालणे बंधनकारक असेल. यासोबतच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संस्था प्रमुखावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सरदार तन्वीर यांच्या नेतृत्वाखालील पीटीआय सरकारच्या निर्णयावर लोक जोरदार टीका करत आहेत. महिलांना पर्याय द्यायला हवा, असे म्हणत मारियाना बाबर यांनी या निर्णयावर टीका केली. गेल्या वर्षी तालिबाननेही अफगाणिस्तानातील महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणे अनिवार्य केले होते.

गेल्या वर्षी, अफगाणिस्तानच्या तालिबान शासकांनी तुघलकी हुकूम जारी करत, सर्व अफगाण महिलांनी सार्वजनिक ठिकाणी डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण कपडे घालणे अनिवार्य केले आहे. गरज असल्याशिवाय महिलांनी घराबाहेर पडू नये, असेही तालिबानी राज्यकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले.

ड्रेसकोडचे उल्लंघन करणाऱ्या महिलांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे. यासोबतच ड्रेसकोडचे उल्लंघन केल्यास त्यांच्या घरातील पुरुषांनाही जबाबदार धरण्यात येणार आहे. याआधीही तालिबान शासकांनी महिलांबाबत अनेक फर्मान काढले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT