ग्लोबल

Queen Elizabeth II यांचे पार्थिव बालमोरल येथून एडिनबर्गला रवाना

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 8 सप्टेंबर रोजी निधन झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

ब्रिटनच्या (United Kingdom) महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Elizabeth II) यांचे 8 सप्टेंबर रोजी निधन झाले. एलिझाबेथ यांच्यावर स्कॉटिश राजधानी एडिनबर्ग येथे 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थिव आज (रविवारी) बालमोरल येथून (Balmoral Castle) स्कॉटिश राजधानी एडिनबर्ग (Scottish capital of Edinburgh) येथे रवाना झाले आहे. सहा तासांचा हा प्रवास असणार आहे.

एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर किंग चार्ल्स तृतीय यांना ब्रिटनचा नवे राजे म्हणून घोषित करण्यात आले. शनिवारी 'एक्सेसेशन कौन्सिल'च्या ऐतिहासिक राज्याभिषेक समारंभ पार पडला.

महाराणी एलिझाबेथ II यांचा थोडक्यात कार्यकाळ

महाराणी एलिझाबेथ II यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी मेफेअर, लंडन येथे झाला. त्या किंग जॉर्ज सहावे आणि राणी एलिझाबेथ यांचे पहिले आपत्य. 2 जून 1953 मध्ये विंडसर कोर्ट येथे महाराणी एलिझाबेथ II यांचा राज्याभिषेक झाला. ब्रिटिश सिंहासन धारण करणाऱ्या त्या सहाव्या महिला होत्या. 8 सप्टेंबर 2022 रोजी 96 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

SCROLL FOR NEXT