Hafiz Saeed Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Election: हाफिज सईदची पार्टी लढवणार निवडणूक; दहशतवादी मुलगाही आजमावणार नशीब

Pakistan: पीएमएमएलचे केंद्रीय अध्यक्ष खालिद मसूद सिंधू एनए-130 मधून पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार आहेत.

Manish Jadhav

Pakistan Election 2024: हाफिज सईदचा राजकीय पक्ष पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग (PMML) ने 8 फेब्रुवारी 2024 रोजी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निवडणुकीत सहभागी होण्याची घोषणा केली आहे. पक्षाने सर्व संसदीय आणि राज्य विधानसभेच्या जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदही या निवडणुकीत नशीब आजमावणार आहे. तो नॅशनल असेंब्ली मतदारसंघ NA-127 लाहोरमधून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, पीएमएमएलचे केंद्रीय अध्यक्ष खालिद मसूद सिंधू एनए-130 मधून पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार आहेत. हाफिज सईदच्या या पक्षाचे निवडणूक चिन्ह 'खुर्ची' आहे.

पाकिस्तानातील सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा

PMML च्या प्रवक्त्याने डॉनला सांगितले की, त्यांच्या पक्षाने देशभरातील सर्व संसदीय जागा आणि प्रांतीय जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. आम्ही एकही जागा बिनविरोध सोडली नसल्याचा दावा ताबीश कय्युम यांनी केला. तथापि, संपर्क केल्यास त्यांचा पक्ष इतर पक्षांसोबत हातमिळवणी तयार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बंदीच्या आधी मिल्ली मुस्लिम लीग हे नाव होते

दरम्यान, PMML ने 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मिल्ली मुस्लिम लीग, बंदी घातलेल्या जमात-उद-दावाचा राजकीय चेहरा म्हणून भाग घेतला होता, परंतु कोणत्याही मतदारसंघातून आशादायक निकाल मिळवण्यात अयशस्वी झाले. सर्व उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. आंतरराष्ट्रीय दबावाखाली पाकिस्तानने जमात-उद-दावा आणि त्याच्या राजकीय गट मिल्ली मुस्लिम लीगवर बंदी घातली तेव्हा त्याचे नाव बदलून पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग असे ठेवले.

अनेक पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक लढवली

पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगचे प्रवक्ते कय्युम यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष फैसल नदीम NA-235 कराची, वित्त सचिव ए.आर. नक्वी पीपी-156 मधून, हाफिज अब्दुल रौफ एनए-119, खालिद नाईक गुजर पीपी-162 मधून, पंजाबचे सरचिटणीस मुझम्मील इक्बाल. हाश्मी एनए-77, गुजरानवाला येथून निवडणूक लढवत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: गँगवॉरच्या छायेत वाढला, क्रिकेटनं सावरलं, गुन्हेगारीचा अंधार मागं सोडून 'अकिल' बनला आयपीएल सुपरस्टार; मुंबई इंडियन्सविरुद्ध गाजवलं वानखेडेचं मैदान VIDEO

Indian Super League: गुवाहाटी येथे बरोबरीची कोंडी फुटणार? सलग दोन विजयांनंतर एफसी गोवासमोर यजमान नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान

VIDEO: "मैदानावर क्रिकेट की कुस्ती?" मोहम्मद आमीरच्या स्लेजिंगवर भडकला फहीम अश्रफ, मारण्यासाठी उगारली बॅट; व्हिडिओ व्हायरल

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ पोलिसांना आता मिळणार अतिरिक्त जागा, मानवाधिकार आयोगाकडून महत्त्वपूर्ण आदेश जारी

Mojtaba Khamenei: "हाता-पायाचं ऑपरेशन, आता चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी!" मोजतबा खामेनेईंची धडकी भरवणारी सद्यस्थिती; अज्ञातवासातून चालतोय इराणचा कारभार

SCROLL FOR NEXT