America Dainik Gomantak
ग्लोबल

Guru Purnima 2023: टेक्सासमध्ये 10,000 लोकांनी केले भगवद्गीतेचे सामूहिक पठण (WATCH)

Guru Purnima 2023: गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर अमेरिकेतील टेक्सास येथील अॅलन ईस्ट सेंटरमध्ये एक विशेष घटना घडली.

Manish Jadhav

Guru Purnima 2023: गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर अमेरिकेतील टेक्सास येथील अॅलन ईस्ट सेंटरमध्ये एक विशेष घटना घडली. 750 हून अधिक मंत्रोच्चारांनी भगवद्गीतेचे सामूहिक पठण करण्यासाठी सुमारे दहा हजार लोकांनी हजेरी लावली.

योग संगीता ट्रस्ट अमेरिका आणि SGS गीता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा भव्य भगवद्गीता पारायण यज्ञ अमेरिकेतील (America) पहिलाच होता.

दरम्यान, सोमवारी हरिद्वारमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. देश-विदेशातील लोक त्यांच्या गुरुंची पूजा करण्यासाठी आणि गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी आखाडे आणि आश्रमात पोहोचले.

दुसरीकडे, पुराणांमध्ये आषाढ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी वेदाचे रचयिते वेद व्यास यांचा जन्म झाला होता. हर की पौडी येथे अनेक भक्तांनी गंगेत स्नान केले, तर आश्रमांमध्ये गुरुंची पूजा करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

यावेळी, आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांनी सांगितले की, "आपल्या धर्मग्रंथानुसार गुरुचे स्थान सर्वोच्च मानले जाते. गुरु आणि शिष्याचे नाते सर्वात पवित्र मानले जाते. गुरुपौर्णिमा हा गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Prepaid Smart Meters: प्रीपेड स्मार्ट मीटर जोडणी कायमस्वरुपी बंद करा! अमित पाटकरांचा वीज खात्याला 15 दिवसांचा अल्टीमेटम

Margao October Heatwave: मडगावकरांचा ऑक्टोबर हिटने काढला घाम! पारा 37.7 अंशांवर, अवघ्या दोन तास चाळीस मिनिटांत तापमानात तीन अंशांची वाढ

8th Pay Commission: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ८व्या वेतन आयोगाचे 5 महत्त्वाचे अपडेट्स; पगारवाढीचा अंतिम निर्णय कधी होणार?

Goa Politics: 'वीरेश बोरकरांनी चोडणकरांकडून तीन कोटी घेतले', अजय खोलकरांच्या आरोपाने गोव्यात खळबळ; 'आरजी'तील अंतर्गत कलह विकोपाला

Kannada Remark Controversy: मुख्यमंत्र्यांच्या 'कानडी' वक्तव्यावरुन कुठ्ठाळीत रणकंदन; भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप! मारियानो रॉड्रिग्ज आक्रमक

SCROLL FOR NEXT