Gun Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पाकिस्तानमध्ये काहीही होऊ शकते, नववर्षाच्या स्वागताला गोळीबार झाला अन्...

जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.

Pramod Yadav

पाकिस्तानमधून (Pakistan) नेहमीच अजब घटना समोर येत असतात. नुकतेच नववर्षाच्या स्वागताला देखील अशीच एक घटना घडली ज्यात अनेकांना स्वागताचा उत्साह भोवला आहे. पाकिस्तानातील कराचीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये हवेत गोळीबार करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले, ज्यात 22 जण जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. शनिवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली.

पाकिस्तानी टेलिव्हिजन नेटवर्क जिओ टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, कराचीच्या विविध भागात झालेल्या हवाई गोळीबारात लहान मुले आणि महिलांसह अनेक लोक जखमी झाले आहेत. शहरात शस्त्र बाळगणे आणि प्रदर्शन करण्यास बंदी असताना देखील ही घटना घडल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. आठ जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर चार जखमींना जिना हॉस्पिटलमध्ये आणि महिला आणि मुलांसह 10 जणांना अब्बासी शहीद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोरंगी येथील गोळीबारप्रकरणी आतापर्यंत तेरा जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. कराचीतील लोक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी रस्त्यावर जमले होते. सिंधचे गव्हर्नर कामरान टेसोरी हेही फटाके पाहण्यासाठी लोकांसह नुमाईश चौरंगी परिसरात हजर होते. दरम्यान, लाहोर, इस्लामाबाद आणि रावळपिंडी येथेही असाच उत्सव साजरा करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT