Guinea Landfill Collapse Dainik Gomantak
ग्लोबल

Guinea Landfill Collapse: पहाटेची झोप ठरली अखेरची! कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने 30 जणांचा मृत्यू; गिनी देशातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

Landslide at Guinea Landfill: गिनी देशाची राजधानी कोनाक्री येथे झालेल्या मुसळधार पावसानंतर एका मोठ्या कचरा डेपोतील कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळल्याने 30 जणांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Landslide at Guinea Landfill: गिनी देशाची राजधानी कोनाक्री येथे झालेल्या मुसळधार पावसानंतर एका कचरा डेपोतील भलामोठा कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने 30 जणांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास बस्सिया जिल्ह्यातील दार-एस-सलाम परिसरात घडली. हा ढिगारा कोसळल्याने जवळची मातीची घरे त्यात गाडली गेली आणि लोक ढिगाऱ्याखाली अडकले. मिळालेल्या माहितीनुसार, सहा जण गंभीर जखमी झाले, परंतु नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकांनी घटनास्थळावरुन अनेक मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. घटनास्थळी लष्कराची बटालियन आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथकांकडून अहोरात्र शोध व बचाव कार्य सुरु आहे. प्रभावित भागात अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशाच्या प्रादेशिक प्रशासन मंत्री जेनाबू टुरे यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला असून संपूर्ण बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत जीवितहानीची आकडेवारी जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, ज्या लँडफिलवर ही दुर्घटना घडली ते ठिकाण सुरक्षेच्या कारणास्तव बंद केले जाणार होते. पावसाळ्यात अशा कचऱ्याचे ढिगारे खचण्याचा मोठा धोका असतो, त्यामुळे प्रशासनाने आधीच तेथील स्थानिक रहिवाशांना तो परिसर खाली करण्याचे निर्देश दिले होते. मात्र दुर्दैवाने नागरिकांचे स्थलांतर पूर्ण होण्याआधीच हा अपघात (Acident) घडला. या घटनेमुळे कचरा व्यवस्थापन आणि लँडफिल शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT