Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: 'कबर जितकी मोठी तितका जास्त कर', दिवाळखोर पाकिस्तानचं भयानक वास्तव

Pakistan: हा देश केवळ आर्थिक विध्वंसाशीच झुंजत नाही, तर राजकीयदृष्ट्याही पंगू झाला आहे.

Manish Jadhav

Pakistan Economic Crisis: भारताचा शेजारी देश पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. हा देश केवळ आर्थिक विध्वंसाशीच झुंजत नाही, तर राजकीयदृष्ट्याही पंगू झाला आहे.

गृहयुद्धाच्या दारात उभी असलेली पाकिस्तानची जनता आता महागाईनंतर शाहबाज सरकारच्या नव्या करामुळे हैराण झाली आहे.

खाद्यपदार्थांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असून, आता स्मशानभूमीतही हा कर जनतेची पाठ सोडत नाही.

सोमवारी संपूर्ण पाकिस्तान बंद होता

सोमवारी कराची, लाहोर (Lahore), इस्लामाबाद रावळपिंडी, पेशावरसह सर्व शहरांमध्ये बाजारपेठा आणि दुकाने बंद होती. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ ही टाळेबंदी करण्यात आली, दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद केली.

मोठी गोष्ट म्हणजे, तेहरीक-ए-लब्बैक या कट्टरपंथी संघटनेने हा बंद पुकारला, त्यासमोर शाहबाज सरकारही पूर्णपणे शरण गेलेले दिसले.

'कबर जितकी मोठी तितका कर जास्त'

जेवढी मोठी कबर तेवढा जास्त टॅक्स असे सरकारने जाहीर केले आहे. महागाईने (Inflation) आधीच लोकांचा जीव घेतला आहे, आता मरणेही कठीण झाले आहे.

गरीब लोक येतात, त्यांच्याकडे कफनासाठीही पैसे नाहीत. वीजबिल भरायचे, की पाण्याचे बिल, गॅसचे बिल भरायचे की मुलांना खायला घालायचे, असे प्रश्न सामान्य जनता उपस्थित करत आहे. पाकिस्तानातील कब्रस्तानांमध्ये हालचाली वाढल्या आहेत.

कर ठरवण्यासाठी कबरींचा आकार मोजला जात आहे. या परिस्थितीतून पाकिस्तानची जनता कधी सुटणार हे येणारा काळच सांगेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT