Sri lanka President Gotabaya Rajapaksa  Dainik Gomantak
ग्लोबल

Gotabaya Rajapaksa Resign: गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा स्वीकारला

Sri Lanka Crisis: सभापतींनी राजीनामा स्विकारल्यानंतर आता 7 दिवसांत नवीन राष्ट्रपतींची नियुक्ती केली जाईल, असेही जाहीर केले आहे

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातून पळ काढलेल्या गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता सभापतींनी राजपक्षे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. (Gotabaya Rajapaksa Resignation news)

यासोबतच सभापतींनी राजीनामा स्विकारल्यानंतर आता 7 दिवसांत नवीन राष्ट्रपतींची नियुक्ती केली जाईल, असेही जाहीर केले आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या गदारोळात स्पीकरच्या विधानाला खूप महत्त्व आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून हजारो निदर्शक गोटाबाया यांच्या राजीनाम्याची आणि नवीन अध्यक्षाची नियुक्ती करण्याची मागणी करत होते.

गोटाबाया देशातुन पळून गेले होते
याआधी श्रीलंकेत आर्थिक संकट असताना लोकांच्या जमावाने राष्ट्रपती भवनावर कब्जा केला होता. याआधीही गोटाबाया राजपक्षे भूमिगत झाले. नंतर गोटाबाया मालदीवमध्ये पळून गेल्याचे सांगण्यात आले. मात्र राजकीय गोंधळामुळे त्यांना मालदीवमध्ये आश्रय देण्यात आला नाही, त्यानंतर ते येथून सिंगापूरला रवाना झाले. सिंगापूरला पोहोचल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा स्पीकरकडे ई-मेलद्वारे पाठवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

SCROLL FOR NEXT