Google will launch soon Google TV Dainik Gomanatk
ग्लोबल

Google आता लवकरच टीव्ही प्लॅटफॉर्मवर, कंपनी करणार अनेक चॅनेल्स लाँच

Google TV हा एक Android आधारित स्मार्ट टीव्ही प्लॅटफॉर्म आहे.

Dainik Gomantak

Google लवकरच टीव्ही प्लॅटफॉर्मवर मोफत टीव्ही चॅनेल आणण्याचा विचार करत आहे. Google TV हा एक Android आधारित स्मार्ट टीव्ही प्लॅटफॉर्म आहे, जो Chromecast वर चालतो आणि तो सोनी, TCL सह इतर स्मार्ट टीव्हींवरही चालू शकतो. Google TV यापूर्वीपासूनच अनेक स्ट्रिमिंग अ‍ॅप्स म्हणजेच Disney+ Hotstar, Netflix आणि अन्यअ‍ॅप्सनाही सपोर्ट करतो मात्र आता नवीन प्लॅननुसार Google TV लवकरच आपल्या युझर्सना मोफत टीव्ही चॅनेल पाहण्याची देखील भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Protocol च्या एका रिपोर्टनुसार Google फ्री आणि अ‍ॅड सपोर्ट असलेल्या स्ट्रिमिंग टेलिव्हिजन प्रोव्हाडर्सशी चर्चा करत आहे.आणि जर ही चर्चा यशस्वी झाली तर ही योजना लवकरच आम्लात येऊ शकेल. दरम्यान, येणाऱ्या काही दिवसांमध्ये Google TV वर हे चॅनेल्स लाँच केले जाऊ शकतात. कंपनी पुढील वर्षाच्या सुरूवातीला या अनोख्या आणि नव्या प्लॅटफॉर्मची घोषणा करण्याची शक्यता आहे.

गुगलच्या या नवीन फीचर्समुळे वापरकर्त्याना या चॅनेल्सद्वारे मेन्यू ब्राऊज करण्यासाठी एक निराळा लाईव्ह टीव्ही मेन्यू मिळणार आहे . स्मार्ट टीव्हीवर स्ट्रीमिंग चॅनेल्स ओव्हर द एअर प्रोग्रामिंगसोबत सादर केले जातात जे अ‍ॅन्टिनासोबत अ‍ॅक्सेस देखील केले जाऊ शकतात. यापूर्वी Roku नेदेखील अशाप्रकारचा एक प्लॅटफॉर्म लाँच केला होता. यावर 200 पेक्षा अधिक फ्री चॅनेल्स वापरण्यासाठी आहेत आणि याअगोदरच सॅमसंग आणि एलजीनं आपल्या प्लॅटफॉर्मवर फ्री स्ट्रिमिंग चॅनेल्स इंटिग्रेट केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT