Google Doodle Celebrate Bubul Tea:
Google Doodle Celebrate Bubul Tea: Dainik Gomantak
ग्लोबल

Google Doodle Celebrate Bubble Tea: गूगलने बनवले खास डूडल; आता तुम्हीही बनवू शकता आवडते 'बबल टी'

दैनिक गोमन्तक

गुगलने एक खास डूडल बनवले आहे. या डूडलमध्ये लोकप्रिय 'बबल टी' दिसत आहे. बबल टी हा बोबा टी आणि पर्ल मिल्क टी या नावांनी देखील ओळखला जातो. फ्रुट जेली किंवा टॅपिओकाने 'बबल टी' मधील बबल बॉल तयार केले जातात.

बबल टीने जागतिक स्तरावर इतकी लोकप्रियता मिळवली की, 30 जानेवारी 2020 रोजी 'बबल टी'ला अधिकृतपणे 'न्यू इमोजी' म्हणून घोषित करण्यात आले. म्हणून गूगलने 'बबल टी'चं एक खास डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये तैवानचा फॉर्मोसन माउंटन डॉग देखील दिसत आहे. गुगलने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.

गुगलने (Google) बनवलेल्या बबल टीच्या खास गूगल डूडलद्वारे तुम्ही बबल टी तयार करू शकता. यासाठी तुम्हाला गूगल डूडलवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक व्हिडीओ दिसेल. त्या व्हिडीओमध्ये फॉर्मोसन माउंटन डॉग आणि त्याचे टी शॉप तुम्हाला दिसेल.

त्यानंतर फॉर्मोसन माउंटन डॉगच्या टी शॉपमध्ये येणाऱ्यांसाठी तुम्हाला बबल टी तयार करायची आहे. हे टी शॉप बंद होण्यापूर्वी तुम्हाला पाच ऑर्डर पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी स्क्रिनवर येणाऱ्या प्रत्येक वस्तुवर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे, त्यानंतर तुमचा बबल टी तयार होईल.

बबल टी टॅपिओका बॉल्सपासून बनविला जातो. हे टॅपिओका बॉल्स साबुदाण्यासारखे असतात. त्यांना सुमारे 20 मिनिटे पाण्यात शिजवावे लागते, नंतर त्यांना दुधाच्या चहामध्ये टाकून त्यात बर्फाचे तुकडे टाकावे लागतात. या थंड पेयाचा तुम्ही आस्वाद घेउ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT