Potsdamer Platz railway station in Germany Dainik Gomantak
ग्लोबल

WATCH: स्टेशनवर अचानक 1000 लोक कुत्र्यांसारखे भुंकायला लागले, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Viral News: वास्तविक, जर्मनीतील पॉट्सडॅमर प्लॅट्झ रेल्वे स्टेशनवर सुमारे 1 हजार लोक जमले आणि त्यानंतर त्यांनी कुत्र्यासारखे वागणे आणि भुंकणे सुरु केले.

Manish Jadhav

Trending News: तुम्ही आजपर्यंत अनेक विचित्र किस्से ऐकले असतील, पण जेव्हा 1 हजार लोक एका ठिकाणी जमतात आणि अचानक विचित्र गोष्टी करायला लागतात तेव्हा काय होते? होय, असाच काहीसा प्रकार जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये घडला आहे.

वास्तविक, जर्मनीतील पॉट्सडॅमर प्लॅट्झ रेल्वे स्टेशनवर सुमारे 1 हजार लोक जमले आणि त्यानंतर त्यांनी कुत्र्यासारखे वागणे आणि भुंकणे सुरु केले. इतकंच नाही तर ते एकमेकांशी फक्त भुंकूनच बोलताना दिसत होते.

हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले लोक अचंबित झाले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्याचे कारण विचारत आहेत.

जेव्हा लोक कुत्र्यासारखे भुंकायला लागले

बर्लिनमधील (Berlin) या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर या लोकांमध्ये कुत्र्याचा आत्मा शिरल्याचा भास होत आहे. ते अचानक कुत्र्यासारखे वागू लागले आणि भुंकायला लागले.

घटनेच्या वेळी या लोकांनी त्यांच्या चेहऱ्यावर कुत्र्याचे मास्क घातले होते. या लोकांना कुत्र्यांसारखे वागताना ज्या कोणी पाहिले त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

ते कुत्र्यासारखे का वागत आहेत?

व्हिडिओ पाहणारा प्रत्येक जण विचारत आहे की, हे लोक असे का करत आहेत? डेली मेलच्या वृत्तानुसार, या लोकांचे म्हणणे आहे की, त्यांचे वागणे माणसासारखे वाटत नाही.

जपानमधूनही असेच एक प्रकरण समोर आले होते

काही दिवसांपूर्वी जपानमधूनही (Japan) असेच एक प्रकरण समोर आले होते. वास्तविक, तिथे टोको नावाच्या व्यक्तीने लाखो रुपये खर्च करुन कुत्रा बनला होता. त्याला कुत्र्यांसारखे जीवन आवडते असेही त्याने सांगितले होते. कुत्रा बनण्याचे त्याचे स्वप्न होते आणि त्याने ते पूर्ण केले.

विशेष म्हणजे, टोकोने यासाठी खास पोशाख बनवला होता आणि तो परिधान करताना तो कुत्र्यासारखी कृती करताना दिसला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT