Indian Fishermen Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: दिवाळीच्या मुहुर्तावर पाकिस्तानच्या तुरुंगातून 80 भारतीय मच्छिमारांची सुटका, तब्बल 3 वर्षांनंतर...

Diwali 2023: दिवाळीच्या मुहुर्तावर पाकिस्तानातून भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

Manish Jadhav

Diwali 2023: दिवाळीच्या मुहुर्तावर पाकिस्तानातून भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. पाकिस्तानातील कराची तुरुंगातून सुटलेले 80 मच्छिमार रविवारी रेल्वेने गुजरातमधील वडोदरा येथे पोहोचले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वडोदरातील या मच्छिमारांना दिवाळीनिमित्त त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राज्याच्या गिर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ येथे बसने नेण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी सोडण्यात आले

अधिकृत माहितीनुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी गुरुवारी मच्छिमारांची सुटका केली आणि दुसऱ्या दिवशी पंजाबमधील (Punjab) अटारी-वाघा सीमेवर गुजरातच्या मत्स्य विभागाच्या पथकाकडे सुपूर्द केले.

ही अटक 2020 मध्ये झाली होती

हे मच्छिमार गुजरातचा किनारा सोडून 2020 मध्ये मासेमारीसाठी पाकिस्तानच्या समुद्री सीमेत घुसले होते, त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सुरक्षा दलाने पकडले होते.

गीर सोमनाथ जिल्ह्यातील 59 मच्छीमार

सुटका करण्यात आलेल्या 80 मच्छीमारांपैकी 59 गिर सोमनाथ जिल्ह्यातील, 15 देवभूमी द्वारका, दोन जामनगर आणि एक अमरेली येथील आहेत, तर तीन मच्छीमार केंद्रशासित प्रदेश दीवमधील आहेत.

सुमारे 200 मच्छीमार अजूनही पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत

अधिकाऱ्यांनी सांगितले की, "हे सर्व मच्छिमार 2020 मध्ये पकडले गेले होते. सुमारे 200 मच्छीमार अजूनही पाकिस्तानच्या (Pakistan) विविध तुरुंगात बंद आहेत. सुटका करण्यात आलेले मच्छिमार त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करु शकतील.'' या वर्षी मे आणि जूनमध्ये पाकिस्तान सरकारने सुमारे 400 भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT