Pope Benedict Death Dainik Gomantak
ग्लोबल

Pope Benedict Death: माजी पोप बेनेडिक्ट यांचे निधन; गत 600 वर्षात राजीनामा देणारे एकमेव पोप

2 जानेवारी रोजी अंत्यदर्शन, 5 जानेवारीला अंत्यसंस्कार करण्यात येणार

Akshay Nirmale

Pope Benedict Death: ख्रिस्ती समुदायाचे धर्मगुरू माजी पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे आज शनिवारी (31 डिसेंबर) निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. व्हॅटिकनमधील मेटर एक्लेसिया स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता त्यांचे निधन झाले.

2 जानेवारी 2023 रोजी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सेंट पीटर्स बॅसिलिका येथे ठेवण्यात येणार आहे. 5 जानेवारीला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोप हे जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुखच नाहीत तर जगाच्या विविध भागात पसरलेल्या अब्जावधी कॅथलिक ख्रिश्चनांचे अध्यात्मिक नेतेही आहेत.

अलीकडच्या काळात तो व्हॅटिकन गार्डन्समधील एक लहान मठ असलेल्या मेटर एक्लेसियामध्ये राहत होते. बेनेडिक्ट यांचा जन्म 16 एप्रिल 1927 रोजी जर्मनीमध्ये झाला होता. त्यांचे खरे नाव जोसेफ अलॉयसियस रॅटसिंगर होते. 24 एप्रिल 2005 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी व्हॅटिकन सिटी येथे पोप म्हणून ते निवडले गेले. ते गेल्या 275 वर्षांतील सर्वात वयोवृद्ध पोप ठरले होते.

वृद्धापकाळामुळे त्यांनी 2013 मध्ये पोप पद सोडले. 600 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच काही कारणास्तव त्यांनी हे पद सोडले. पोप ग्रेगरी बारावा यांनी बेनेडिक्टच्या आधी 1415 मध्ये पदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यानंतर ख्रिश्चनांच्या दोन गटांमधील भांडण हे त्याचे कारण बनले. अशा प्रकारे, जवळजवळ 600 वर्षांच्या इतिहासात पोपपदाचा राजीनामा देणारे ते पहिले पोप होते.

पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या निधनानंतर जगभरातील महत्वाच्या व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी ट्विटमध्ये लिहिले की, 'पोप एमेरिटस बेनेडिक्ट यांनी आपले संपूर्ण जीवन चर्च आणि मसिहाच्या शिकवणीसाठी समर्पित केले. समाजासाठी त्यांनी केलेल्या भरीव सेवेसाठी ते स्मरणात राहतील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT