Imran khan Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजी प्रकरणी इम्रान खानयांच्यासह 150 जणांवर गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

इस्लामाबाद: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी पाकिस्थानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या अटकेची शक्यता ही वाढली आहे. (Former Pakistani Prime Minister Imran Khan's arrest ?)

नुकत्याच मिळालेल्या ताज्या माहितीनुसार इम्रान खान यांना कधीही अटक होऊ शकते. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजीच प्रकरणी इम्रान खान यांच्यासह 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्ष पीएमएल-एनच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, मदिना येथे जे काही घडले ते इम्रान खान यांच्या पक्षाच्या इशाऱ्यावर घडले.

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्यावतीने, माजी पंतप्रधान इम्रान खान यांना घोषणाबाजी प्रकरणी मदिना येथे अटक करण्यात येणार असल्याचे मीडिया अहवालात म्हटले आहे. या आठवड्यात सौदी अरेबियातील मदिना येथे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांच्या शिष्टमंडळाविरोधात नारा देण्यात आला होता. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सांगण्यावरून ही घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप आहे. इम्रानसह या लोकांवर गुन्हा विशेष म्हणजे, पाकिस्तानातील फैसलाबादमध्ये गेल्या शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नोंदवण्यात आलेल्या असे एफआयआरमध्ये लिहिले आहे कि, मदिना येथे घोषणाबाजी करून पैगंबर मशिदीला अपवित्र करण्यात आले. गुंडगिरी केली असून मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहेत. एफआयआरनुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या 100 हून अधिक समर्थकांना पाकिस्तान आणि ब्रिटनमधून सौदी अरेबियात हद्दपार करण्यात आले होते आणि मदिना येथील मशिद-ए-नबवी येथे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांच्या शिष्टमंडळाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने. खान आणि इतर पीटीआय नेत्यांनी यासंदर्भात कार्यकर्त्यांना सूचना दिल्या असल्याचं ही यात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT