Lalit Modi @LalitKModi
ग्लोबल

Lalit Modi Gets British Citizenship: भारतात आर्थिक गैरव्यवहार करुन पळालेला ललित मोदी बनला ब्रिटनचा नागरिक; म्हणाला, "आजपासून आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात"

Former IPL Chairman Lalit Modi Gets British Citizenship: इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक, भारताचे माजी आयपीएल चेअरमन आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली देश सोडून पळून गेलेले ललित मोदी यांना आता ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले.

Manish Jadhav

Former IPL Chairman Lalit Modi Gets British Citizenship: इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक, भारताचे माजी आयपीएल चेअरमन आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली देश सोडून पळून गेलेले ललित मोदी यांना आता ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले. आज 15 नोव्हेंबरच्या सकाळी ललित मोदींनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शेअर करत ब्रिटनचे नागरिकत्व मिळाल्याची घोषणा केली.

त्याआधी 14 नोव्हेंबर रोजी शनिवारच्या दिवशी ऑक्सफर्ड युनियनला संबोधित करताना त्यांनी ब्रिटनला आपले स्थायी घर म्हणून घोषित करत नागरिकत्व मिळाल्याचा खुलासा केला होता. परिवार आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत एका विशेष समारंभात त्यांना हे नागरिकत्व प्रदान करण्यात आले. ब्रिटनमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्य करत असलेले मोदी आता अधिकृतपणे तिथले नागरिक बनले असून, हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत गौरवान्वित करणारा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले.

'एक्स' वरील आपल्या पोस्टमध्ये ब्रिटनच्या संस्कृतीची प्रशंसा करताना ललित मोदींनी सांगितले की, ब्रिटनची संस्कृती त्यांच्या मनाला भिडली असून, तिथल्या संस्था आणि परंपरांबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. ब्रिटनचे (Britain) नागरिक बनणे ही केवळ सन्मानाची नाही तर एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे, जी ते पूर्ण अभिमानाने स्वीकारत आहेत. भविष्यात आपल्या या नवीन घराच्या विकासासाठी सकारात्मक योगदान देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

किंग चार्ल्स तृतीय यांच्या जन्मदिवसाच्या मुहूर्तावर ब्रिटिश नागरिकता मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी ‘गॉड सेव द किंग’ असेही लिहिले. विशेष म्हणजे, ललित मोदींनी 2008 मध्ये भारतात बहुचर्चित टी-20 क्रिकेट स्पर्धा आयपीएलची सुरुवात केली आणि ते त्याचे पहिले चेअरमनही राहिले. मात्र, 2010 मध्ये आर्थिक अनियमितता आणि फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर ते भारत सोडून लंडनला पळून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Daily Horoscope: कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक लाभाचा योग! 'या' राशींसाठी रविवार अत्यंत लाभदायी; ग्रहांच्या स्थितीत मोठा बदल

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT