Flight Dainik Gomantak
ग्लोबल

Flight Ban Update: UAE मध्ये जाणाऱ्या भारतीयांना मोठा झटका; जाणून घ्या

कंपनीने भारत, पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेशच्या उड्डाणांवर 31 जुलैपर्यंत बंदी घातली आहे.

दैनिक गोमन्तक

युएई फ्लाइट बॅन अपडेटः युएईच्या (UAE) एतिहाद एअरलाइन्सच्या (Etihad Airlines) निर्णयामुळे भारतीयांच्या (Indian) अडचणी वाढल्या आहेत. विमान कंपनीने उड्डाणांवरील बंदी वाढविली आहे. कंपनीने भारत, पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेशच्या 31 जुलैपर्यंत उड्डाणांवर बंदी घातली आहे. एरोहादने सांगितले आहे की कोरोना विषाणूच्या (Covid 19) संसर्गाचा धोका लक्षात घेता, भारतातून येणाऱ्या उड्डाणांवरील बंदी वाढविण्यात आली आहे. युएईमध्ये राहणाऱ्या किंवा तेथे जाण्याची इच्छा असणार्‍या भारतीयांना यामुळे त्रास होणार आहे.

एतिहाद एअरवेजने भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांमध्ये जाणा-या उड्डाणांवरील बंदी वाढविली आहे. त्यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे की कोरोना विषाणूमुळे भारतातून येणाऱ्या प्लाईट्सवरील बंदी (युएई फ्लाइट बॅन एक्सटेंशन) वाढविण्यात आली आहे. खलिजा टाईम्सच्या अहवालानुसार केवळ परदेशी राजनयिक, युएई नागरिक आणि गोल्ड व्हिसा असणाऱ्यांना युएईमध्ये प्रवास करण्यास सूट देण्यात आली आहे. तथापि, या लोकांना विमानात बसण्यापूर्वी जास्तीत जास्त 48 तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे.

एमिरेट्स एअरलाइन्सनेही 'हा' निर्णय घेतला

यापूर्वी शुक्रवारी, अमीरात एअरलाइन्सने दक्षिण आफ्रिका आणि नायजेरिया व तेथील उड्डाणांवर बंदी घातली होती. या अहवालात म्हटले आहे की युएई ते मुंबई, कराची, ढाका दरम्यान उड्डाणे 31जुलैपर्यंत निलंबित केली असल्याचा संदेश प्रवाशांना मिळतो आहे. त्याचबरोबर, एतिहादने घोषणेपूर्वी सांगितले होते की, भारतातील उड्डाणांवरील बंदी उठविण्यात आलेली नाही, ही बंदी 21जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र आता युएईच्या अधिकाऱ्यांनी भारतातील उड्डाणांवरील बंदी हटविण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

13 देशांमधील प्रवेश अद्याप प्रतिबंधित

संयुक्त अरब अमिरातीच्या जनरल सिव्हिल एविएशन अथॉरिटीने (जीसीएए) म्हटले आहे की, 13 देशांमधील प्रवेश अद्याप प्रतिबंधित आहे. ज्यामुळे मोठ्या संख्येने कर्मचारी भारतातच अडकले आहेत यातील सर्वात मोठी संख्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आहे. हे आरोग्य कर्मचारी युएईमध्ये परत जाण्याच्या आशेवर आहेत. एतिहाद एअरलाईन्स अबूधाबीमधून उडणाऱ्या प्लाईट्सचे संचालन करते. त्याचे मुख्यालय देखील अबूधाबीमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाची प्रतिमा काळवंडली, विरोधकांवर उलटणार डाव; मोदी सरकार करणार 'खेला'

संपादकीय: ‘ते’ आले अन् गेले!

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

SCROLL FOR NEXT