<div class="paragraphs"><p>Nasaच्या अंतराळयानाने पाहिल्यादाच केला सूर्याला स्पर्श</p></div>

Nasaच्या अंतराळयानाने पाहिल्यादाच केला सूर्याला स्पर्श

 

Twitter /@NASA

ग्लोबल

Nasaच्या अंतराळयानाने पाहिल्यांदाच केला सूर्याला स्पर्श

दैनिक गोमन्तक

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या (NASA) अंतराळयान पार्कर सोलर प्रोबने प्रथमच सूर्याला (Sun) स्पर्श केला आहे. हे प्रोब सूर्याच्या वातावरणात राहिला आहे, जे आतापर्यंत अस्पर्श राहिले आहे. अमेरिकन जीओफिजीकल युनियनच्या बैठकीत नासाच्या शास्त्रज्ञांनी या नेत्रदीपक कामगिरीची घोषणा केली. पार्कर सोलर प्रोब एप्रिल महिन्यात सूर्यापासून 8 व्या प्रवासादरम्यान कोरोनामधून पार पडला होता.

हे मिशन (Mission) अशक्य होते कारण सूर्याच्या (Sun) कोरोनाचे तापमान 2 दशलक्ष डिग्री फॅरेनहाइट आहे. नासाचे हे मिशन विज्ञान जगतसाठी सर्वात मोठे यश आहे. मिळलेल्या अहवालानुसार पार्कर सोलर प्रोब (Parker Solar Probe) रॉकेटशिपने 28 एप्रिल रोजी सूर्याच्या वरच्या वातावरणात, ज्याला कोरोना म्हणतात, त्यात यशस्वीरित्या प्रवेश केला. यासोबतच नासाच्या या रॉकेटने (Rocket) लाल गरम ताऱ्याच्या पृष्ठभागावर असलेल्या कण आणि चुंबकीय क्षेत्राचे नामूनेही घेतले आहेत, जे आतापर्यंत पूर्ण करणे अशक्य मानले जात होते.

सूर्याच्या कोरोना वातावरणात 5 तास राहिले हे स्पेसक्राफ्ट

नासाने आपल्या अहवालात म्हटले आहे की 28 एप्रिल 2021रोजी एका बिंदुवर सुमारे 5 तास सूर्याच्या कोरोना वातावरणात राहिले. आकडेवारीनुसार असे दिसून आले की अंतराळ (Space) यानाने सूर्याच्या कोरोनामध्ये तीन वेळा प्रवेश केला होता. नासाच्या (Nasa) या एतीहासिक मोहिमेचा अहवाल फिजिकल रिव्ह्यू लेटर्स या वैज्ञानिक पेपरमध्ये प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये CFA खगोलभौतिकशास्त्रज्ञ अँथनी केस हे सोलर प्रोब कप स्वत:च अभियांत्रिकितील एक अविश्वसनीय पराक्रम कसे होते यांचे वर्णन करतात.

* नासाची मोहीम अशी झाली शक्य

हावर्ड आणि स्मिथसोनियन (CAF) येथील खगोल भौतिकशास्त्र केंद्राच्या सदस्यांसह शास्त्रज्ञ आणि अभियंते यांच्या मोठ्या सहकार्याने हा ऐतिहासिक क्षण प्राप्त झाला आहे. तपासतील महत्वाचे साधन कोणी तयार केले आणि त्याचे परीक्षण केले. सोलर प्रोब कप हे एकमेव साधन आहे ज्याने सूर्याच्या वातावरणातील कण गोळा केले, ज्यामुळे शास्त्रज्ञांना (Scientists) हे सत्यापित करण्यात मदत होते की अवकाशयान खरोखरच कोरोनाला स्पर्श करण्यात यशस्वी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Lok Sabha Election 2024: ‘’शहजाद्याला PM बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा’’; व्होट जिहादवरुन मोदींनी काँग्रेसला पकडलं कोंडीत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

SCROLL FOR NEXT