Yemen Houthis Attack Twitter
ग्लोबल

Yemen Houthis दहशतवादी हल्ल्यातबाबत UAEने केले पहिले विधान

आता यूएईने या हल्ल्यानंतर पहिले निवेदन जारी केले या हल्ल्याचा केवळ निषेधच नाही तर प्रत्युत्तराचेही संकेत दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

सोमवारी UAE मधील अबुधाबी (Abu Dhabi) विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट झाले. या दहशतवादी हल्ल्यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला होता. येमेनच्या हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आता UAE ने उघडपणे या हल्ल्याचा निषेध करत मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

UAE चे पहिले विधान

यूएईचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान यांनी म्हटले आहे की, हौथी बंडखोरांनी निवासी भागावर केलेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की ज्यांनी हा हल्ला केला आहे, ते नक्कीच उत्तरदायी असेल आणि त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. यूएईला या दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. असे हल्ले हे आंतरराष्ट्रीय नियमांचेही उल्लंघन आहे, असे मत यूएईच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केले.

अशा दहशतवादी हल्ल्यांविरोधात संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज असल्याचे युएईनेही आपल्या निवेदनात नमूद केले आहे. अशा हल्ल्यांचा सर्वांनी मिळून निषेध केला पाहिजे. अशा प्रकारे सर्वसामान्यांचा जीव घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

भारताने काय म्हटले आहे?

या संपूर्ण घटनेवर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनीही ट्विट केले आहे. यूएईच्या अर्थमंत्र्यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या घटनेबद्दल जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय दूतावास तिथल्या प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत असून पीडितांच्या कुटुंबीयांना पूर्ण मदत देण्याचा प्रयत्न करत आहे. हुथी बंडखोरांबद्दल बोलायचे तर ते इराणचे समर्थक असल्याचे मानले जात आहे. इराण थेट हौथींना पाठिंबा देत असल्याचे सांगितले जाते. याची दोन कारणे समोर येतात. एक म्हणजे इराण देखील शिया देश आहे आणि हुथी देखील शिया आहेत. आणि दुसरे म्हणजे इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

Sindhudurg Crime News: अंगावर जखमांच्या खुणा, अर्धनग्न अवस्था अन् गोधडीत गुंडाळलेला मृतदेह; तिलारी कालव्यात सापडलेल्या मृतदेहाने खळबळ, घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT