Fidel Castro Dainik Gomantak
ग्लोबल

Fidel Castro: 35 हजार महिलांशी संबंध असलेला राष्ट्राध्यक्ष! 600 हून अधिक वेळा...

Former Cuban President: जगात एक राष्ट्राध्यक्ष असा देखील झाला ज्याचे 35,000 महिलांशी संबंध असल्याचा दावा केला जातो.

दैनिक गोमन्तक

Former Cuban President: जगात एक राष्ट्राध्यक्ष असा देखील झाला, ज्याचे 35,000 महिलांशी संबंध असल्याचा दावा केला जातो. याशिवाय त्याला 600 हून अधिक वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न देखील झाला, परंतु प्रत्येक वेळी तो फरार झाला. शत्रू त्याला हानी पोहोचवू शकले नाही. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो होते. फिडेल कॅस्ट्रो नेहमी आपल्या शत्रूंवर वरचढ ठरले. एकदा एक स्त्री कॅस्ट्रो यांना मारण्यासाठी त्यांची प्रेमिका देखील बनली होती, परंतु ती यशस्वी होऊ शकली नाही. क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्या जीवनातील काही रंजक किस्से जाणून घेऊया.

दरम्यान, क्युबाचे (Cuba) माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो (Fidel Castro) यांच्यावर बनवलेल्या माहितीपटात त्यांचे महिलांशी असलेले संबंध आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख आहे. विषारी सिगारपासून ते स्फोटक सिगारेटपर्यंत शत्रूंनी अनेक मार्गांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही.

तसेच, फिडेल कॅस्ट्रो यांचा जन्म 13 ऑगस्ट 1926 रोजी बिरान, क्युबात झाला होता. क्युबातील सत्ता एका उठावानंतर फिडेल कॅस्ट्रो यांच्या हातात आली. फिडेल कॅस्ट्रो यांना कम्युनिस्ट क्युबाचे जनक म्हटले जाते. 1959 मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबात सत्तापालट केला होता. यानंतर 2008 पर्यंत ते सत्तेत राहिले.

दुसरीकडे, क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांनी नेहमीच अमेरिकेच्या (America) धोरणांना विरोध केला. एवढेच नाही तर त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची खिल्लीही उडवली. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी कॅस्ट्रो यांना मारण्याचा बराच काळ प्रयत्न केला परंतु ते नेहमीच अयशस्वी ठरले. फिडेल कॅस्ट्रो यांच्यावरील 600 हून अधिक हल्ले अयशस्वी झाले.

शिवाय, फिडेल कॅस्ट्रो यांच्यावर बनवलेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये त्यांचे 35 हजार महिलांशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही प्रक्रिया जवळपास 4 दशके सुरु राहिली. फिडेल कॅस्ट्रो त्यांच्या हुकूमशाहीसाठी ओळखले जात होते. त्यांनी क्युबावर सुमारे 49 वर्षे राज्य केले. विशेष म्हणजे, 2008 साली क्यूबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांनी आपल्या भावाकडे सत्तेच्या चाव्या सोपवल्या होत्या. आज 25 नोव्हेंबर रोजी वयाच्या 90 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT