FIA’s 42nd Dance Pe Chance Dainik Gomantak
ग्लोबल

न्यू जर्सीत भारतीय संस्कृतीचा डंका! 42 व्या 'डान्स पे चान्स'मध्ये 870 मुलांचा सहभाग; कडाक्याच्या थंडीतही कलाकारांचा जोश

FIA’s 42nd Dance Pe Chance: भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आणि 'वंदे मातरम'चे १५० वे वर्ष साजरी करणाऱ्या या सोहळ्याने अमेरिकेतील सर्वात मोठ्या भारतीय-अमेरिकन नृत्य स्पर्धेचा आपला मान पुन्हा एकदा सिद्ध केला.

Sameer Amunekar

फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन (FIA-NY-NJ-CT-NE) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'डान्स पे चान्स' (DPC) या प्रतिष्ठित सांस्कृतिक स्पर्धेची ४२ वी आवृत्ती शनिवारी, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी न्यू जर्सीतील पेट्रियट्स थिएटर येथे दिमाखात पार पडली. भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आणि 'वंदे मातरम'चे १५० वे वर्ष साजरी करणाऱ्या या सोहळ्याने अमेरिकेतील सर्वात मोठ्या भारतीय-अमेरिकन नृत्य स्पर्धेचा आपला मान पुन्हा एकदा सिद्ध केला.

गोठवणारी थंडी असतानाही कलाकारांचा जोश

बाहेर शून्य अंशाखालील गोठवणारी थंडी असतानाही, सुमारे ८७० बालकलाकार आणि तरुणांच्या उत्साहात तसूभरही कमतरता नव्हती. १८ नामांकित नृत्य अकादमींच्या माध्यमातून ३१ हून अधिक सादरीकरणे यावेळी सादर करण्यात आली. यामध्ये भारतीय शास्त्रीय, लोकनृत्य, बॉलिवूड आणि समकालीन नृत्यप्रकारांचा अद्भूत संगम पाहायला मिळाला. सुमारे २,२०० प्रेक्षकांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

पद्मिनी कोल्हापुरे यांची उपस्थिती

या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, कोरिओग्राफर सुप्रिया दोशी आणि शास्त्रीय नृत्यांगना अंतिमा चक्रवर्ती यांनी केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भारताचे महावाणिज्य दूत अँबॅसिडर बिनय एस. प्रधान यांच्या हस्ते FIA च्या २०२६ च्या कार्यकारी समितीचा शपथविधी पार पडला. प्रधान यांनी FIA च्या कार्याचे कौतुक केले आणि डायस्पोरासाठी वाढवलेल्या दूतावास सेवांची माहिती दिली.

ब्रॉडवे स्टाईल सादरीकरण आणि तंत्रज्ञानाची जोड

यावर्षीची स्पर्धा 'ब्रॉडवे' शैलीतील भव्य निर्मितीसाठी चर्चेत राहिली. मोठ्या एलईडी स्क्रीन, आकर्षक प्रकाशयोजना आणि भव्य पोशाखांमुळे रंगमंच उजळून निघाला होता. मायनर, ज्युनियर, सीनियर आणि अडल्ट अशा विविध गटांत ही स्पर्धा पार पडली. उत्कृष्ट कोरिओग्राफी, थिमॅटिक इनोव्हेशन आणि आऊटस्टँडिंग स्पिरीट यांसारख्या श्रेणींमध्ये विजेत्यांना गौरवण्यात आले.

पिढ्यांमधील दुवा साधणारा 'FIA' चा उपक्रम

FIA चे अध्यक्ष श्रीकांत अक्कपल्ली आणि चेअरमन अंकूर वैद्य यांनी या कार्यक्रमाच्या यशाबद्दल स्वयंसेवकांचे आभार मानले. 'डान्स पे चान्स' हा केवळ एक कार्यक्रम नसून भारतीय वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारा एक दुवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या यशस्वी सोहळ्यानंतर आता २०२७ मध्ये होणाऱ्या ४३ व्या आवृत्तीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT