Facebook Dainik Gomantak
ग्लोबल

Facebook: फेसबुकवर रील्स बनवणाऱ्यांचे बल्ले-बल्ले, Video ची वाढवली कालमर्यादा

Facebook Reels Time Limit Increased: मेटा ने फेसबुकवर क्रिएटर्ससाठी काही नवीन 'क्रिएटिव्ह एक्सप्रेशन' फीचर्स लाँच केले आहेत.

Manish Jadhav

Facebook Reels Time Limit Increased: मेटा ने फेसबुकवर क्रिएटर्ससाठी काही नवीन 'क्रिएटिव्ह एक्सप्रेशन' फीचर्स लाँच केले आहेत. नवीन फीचर्स आणल्यानंतर फेसबुकवर रील्स बनवणाऱ्या क्रिएटर्संना आणखी फायदा होणार आहेत. फेसबुकने रीलची काल मर्यादा वाढवली आहे. Reels क्रिएटर आता Facebook वर 90 सेकंदाचे व्हिडिओ तयार करु शकतात.

पूर्वी, यूजर्संना Facebook वर रील्स तयार करण्यासाठी फक्त 60 सेकंद मिळायचे. कंपनीने मेटा फॉर क्रिएटर्स अकाऊंटद्वारे या प्रमुख अपडेटची घोषणा केली. वेळेची मर्यादा वाढल्याने क्रिएटर्संना आणखी एक मोठे फिचर्स मिळाले आहे.

आता क्रिएटर्स त्यांच्या फोनच्या मेमरीमधून सहजपणे रील्स तयार करु शकतात. म्हणजेच, जर तुम्ही तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये एखादा व्हिडिओ सेव्ह केला असेल, तर तो Reels वरही अपलोड केला जाऊ शकतो.

दुसरीकडे, फेसबुकची ही दोन्ही फिचर्स व्हिडिओ क्रिएटर्संना सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म Instagram मध्ये फिचर्स मिळतात त्याच प्रकारे कार्य करतात. कंपनीने नवीन ग्रूव्ह फिचर्स देखील सादर केले आहे, जे यूजर्संच्या व्हिडिओमधील गतीला गाण्याच्या तालावर आपोआप सिंक करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT