Dr. Tedros anadhanom gebreusus Dainik Gomantak
ग्लोबल

WHO च्या प्रमुखावर त्यांचाच देश झाला 'खफा'! 'टायग्रे हत्याकांडा'चं काय आहे कनेक्शन?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) 2017 मध्ये डॉ. टेड्रोस अ‍ॅधानोम गेब्रेयसस (Dr. Tedros Anadhanom Gebreusus) यांची महासंचालक म्हणून नियुक्ती केली. हे पद भूषवणारे ते पहिले आफ्रिकन आहेत.

दैनिक गोमन्तक

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2017 मध्ये डॉ. टेड्रोस अ‍ॅधानोम गेब्रेयसस यांची महासंचालक म्हणून नियुक्ती केली. हे पद भूषवणारे ते पहिले आफ्रिकन आहेत. त्यांच्या निवडीची प्रक्रियाही ऐतिहासिक ठरली होती. या दरम्यान, एक गुप्त मतदान घेण्यात आले, ज्यामध्ये WHO च्या 70 वर्षांच्या इतिहासात प्रथमच सर्व सदस्य देशांना समान मतदानाचा अधिकार (WHO Chief Selection) देण्यात आला. यापूर्वी या पदावरील नियुक्ती कार्यकारी मंडळाच्या मतदानातून होत होती. या मतदानामध्ये टेड्रोस दोन तृतीयांश बहुमताने विजयी झाले. (Ethiopian Government Angry With WHO Chief Tedros Adhanom Ghebreyesus)

दरम्यान, त्यांच्या नियुक्तीनंतर मायदेश असलेल्या इथिओपियामध्ये (Ethiopia) उत्सव साजरा करण्यात आला, परंतु आता टेड्रोस दुसऱ्यांदा WHO चे प्रमुख बनण्यास इच्छुक असल्याने इथिओपियामध्ये त्यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. इथोओपियन सरकारने त्यांच्यावर देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करुन गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. (Elections in the WHO). तथापि, ट्रेडोस यांना पुन्हा निवडून येण्यासाठी इथिओपियाच्या पाठिंब्याची गरज नाही, कारण त्यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चांगली कामगिरी केली असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे त्यांना कोणताही उमेदवार विरोध करत नाही.

टेड्रोसविरोधात नाराजी का?

जेव्हा टेड्रोसने टायग्रेमधील आरोग्य आणि मानवतावादी परिस्थितीबद्दल बोलले तेव्हा आदिस अबाबाला लाजीरवाणे वाटले होते. नागरी युद्धादरम्यान, टायग्रेमध्ये नागरिकांवर वांशिक हल्ले करण्यात आले. औषधे आणि खाद्यपदार्थांचा पुरवठाही बंद करण्यात आला होता. या संघर्षात टेड्रोस यांचे कुटुंब आणि त्यांच्या मित्रांनाही लक्ष्य करण्यात आले होते. इथिओपियातील टायग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंटचे (People's Liberation Front) वर्चस्व असलेल्या माजी प्रशासनाचे टेड्रोस प्रमुख सदस्य होते. टायग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट हा विद्यमान पंतप्रधान अबी अहमद यांचा विरोधी पक्ष आहे.

गप्प बसायचे का?

मँचेस्टर विद्यापीठातील जागतिक आरोग्य आणि मानवतावादी प्रकरणांचे प्रोफेसर मुकेश कपिला म्हणाले की, यूएन एजन्सीच्या निवडलेल्या प्रमुखाविरुद्धचा आक्रोश व्यापक समस्या निर्माण करतो. जेव्हा आंतरराष्ट्रीय संघटनांचे नेते, सदस्य राष्ट्रे सार्वत्रिक नियमांचे उल्लंघन करताना पाहतात तेव्हा त्यांनी बोलायचे की गप्प बसायचे?

डब्ल्यूएचओ ही एक बहुपक्षीय विकास संस्था आहे. परंतु त्यांचे आरोग्य क्षेत्रातील कार्य मोठ्या प्रमाणात मानवतावादी आहे. जागतिक महामारीमुळे ही संस्था पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. टेड्रोस यांची कोंडी सर्व मानवतावाद्यांना माहीत आहे. पीडितांना होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध किंवा छळवणुकीविरुद्ध बोलल्यास सरकार त्यांचा निषेध करते. त्याचबरोबर पीडितांसाठी आवाज न उठवल्यास मानवाधिकार कार्यकर्ते त्यांचा निषेध करतात.

जुने नियम चालत नाहीत

इथिओपिया, येमेन आणि म्यानमारसारख्या भागात मानवतावाद्यांची भूमिका झपाट्याने कमी होत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, मानवाधिकार परिषद, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय किंवा आफ्रिकन युनियन यासारख्या बहुपक्षीय संरचना आणि संस्थांचे संरक्षण कवच त्यांची अवहेलना करणाऱ्या शक्तिशाली देशांच्या भूराजनीतीमुळे कमकुवत झाले आहे. आजकाल मानवतावादी इथिओपियामध्ये फक्त राष्ट्रीय अधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार काम करु शकतात.

कमी करणारा प्रभाव

कठीण परिस्थितीत मदत करणार्‍यांनी पूर्वी रेडक्रॉस रेड क्रेसेंट चळवळीतून प्रेरणा घेतली, त्यात इंटरनॅशनल रेडक्रॉस कमिटी (ICRC), इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस (IFRC) आणि रेड क्रेसेंट सोसायटीज यांचा समावेश होता, परंतु आता त्यांचा सामूहिक प्रभाव जगभरात कमी होत आहे. ICRC आणि IFRC या प्रकरणावर मौन बाळगून आहेत. तर दुसरीकडे UN एजन्सींच्या काही धाडसी नेत्यांनी इथिओपियातील परिस्थितीविरुद्ध आवाज उठवला आहे. टेड्रोस यांना मानवतेसाठी निर्भयपणे आवाज उठवण्याचे बळ मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT