Vladimir Putin and Volodymyr Zelenskyy (President of Ukraine) Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेनमध्ये एक महिना आणीबाणी! प्रत्येक नागरिक हाती घेणार शस्त्र

युक्रेनवर रशियन हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. रशियाला देशाबाहेर लष्करी शक्ती वापरण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे युक्रेनच्या प्रत्येक नागरिकाला स्वसंरक्षणासाठी शस्त्रे ठेवण्याची परवानगी असेल.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही आहे. युक्रेनवर रशियन हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. एक दिवस आधी, रशियाच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना देशाबाहेर लष्करी शक्ती वापरण्याची परवानगी दिली आहे. अशा स्थितीत बुधवारी युक्रेनच्या संसदेत कायद्यासाठी मतदान झाले. ज्यामध्ये युक्रेनच्या प्रत्येक नागरिकाला स्वसंरक्षणासाठी शस्त्रे ठेवण्याची परवानगी असेल. युक्रेन डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रदेशांव्यतिरिक्त 30 दिवसांची आणीबाणी लागू करण्याची योजना आखत आहे, रशियावर कठोर निर्बंध घालण्याची मागणी करत आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. रशियाच्या कठोर वृत्तीमुळे जग दोन छावण्यांमध्ये विभागले गेले आहे. अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीसारख्या बड्या देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. दुसरीकडे, रशियाच्या(Russia) भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अनेक मंचांवर युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे नाराज असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे युक्रेननेही रशियाविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनच्या संसदेने प्रत्येक नागरिकाकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्रे असणे आवश्यक असलेला कायदा मंजूर केला आहे. याव्यतिरिक्त, युक्रेन डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रदेशांव्यतिरिक्त, त्याच्या फुटीरतावादी भागात 30 दिवसांची आणीबाणी लागू करण्याची योजना आखत आहे.

अलीकडेच, युक्रेनमधील (Ukraine) लुहान्स्क आणि डोनेत्स्क या दोन फुटीरतावादी भागांना रशियाने स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आणि एक दिवस आधीच रशियन सैन्याने या भागांवर कब्जा केला. अशा स्थितीत रशियाच्या हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या संसदेने बुधवारी एका महत्त्वाच्या कायद्यावर मतदान केले. या कायद्यानुसार युक्रेनचा प्रत्येक नागरिक स्वसंरक्षणासाठी शस्त्र ठेवू शकतो. संसदेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "हा कायदा स्वीकारणे राज्य आणि संपूर्ण समाजाच्या हिताचे आहे. युक्रेनच्या नागरिकांना सध्याच्या धोक्यांमुळे या कायद्याची गरज आहे." 351 संसद सदस्यांनी देखील रशियाविरूद्ध निर्बंध मंजूर केले आहेत. रशियाने अलीकडेच पूर्व युक्रेनमधील दोन फुटीरतावादी-नियंत्रित प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. आणि तेथे रशियन सैन्याच्या तैनातीला पाठिंबा दिला आहे.

सैटेलाइट चित्रांद्वारे रशियाची पोल खोल

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे सांगत आहेत की युक्रेनशी त्यांचे राजनैतिक दरवाजे अजूनही खुले आहेत, मात्र रशियाच्या सुरक्षेशी तडजोड केली जाऊ शकत नाही. दुसरीकडे, रशियाच्या दाव्यांचा पर्दाफाश करत अमेरिकेची (America) खासगी कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीजने मंगळवारी दावा केला की, सॅटेलाइट इमेजने रशियाचा पर्दाफाश केला आहे. हे फोटो दर्शवतात की रशियाने युक्रेनियन सीमेजवळ, दक्षिण बेलारूसमध्ये 100 हून अधिक लष्करी वाहने आणि डझनभर लष्करी तंबू तैनात केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Russian Woman Viral Video: 'पाणीपुरी नको!' म्हणत रशियन महिलेनं फिरवली पाठ; पण भेळपुरीची चव चाखताच म्हणाली, Wow.... पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT