Elon Musk  Dainik Gomantak
ग्लोबल

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क यांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेचं केलं कौतुक

Comparison between Indian and US election systems by Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि अब्जाधीश एलन मस्क यांनी भारताच्या निवडणूक व्यवस्थेवर मोठे भाष्य केले आहे.

Manish Jadhav

Elon Musk News: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि अब्जाधीश एलन मस्क यांनी भारतीय निवडणूक व्यवस्थेवर मोठे भाष्य केले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची भारताच्या लोकसभा निवडणुकीशी तुलना करताना ते म्हणाले की, भारताने एका दिवसात 640 दशलक्ष म्हणजेच 64 कोटी मतांची मोजणी केली, परंतु अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात अजूनही मतमोजणी सुरु आहे.

सोशल मीडिया साइट X चे मालक एलन मस्क यांनी स्वतःच्या सोशल मीडिया साइटवर आपले मत मांडले आहे. एका पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी लिहिले की, 'भारताने एका दिवसात 640 दशलक्ष मतांची मोजणी केली, परंतु कॅलिफोर्निया अजूनही मतांची मोजणी करत आहे.'

दरम्यान, अमेरिकेत 5-6 नोव्हेंबरला मतदान झाले होते. त्यानंतर अजूनही तिथे मतमोजणी सुरु आहे. कॅलिफोर्निया हे देखील यापैकी एक राज्य आहे. मात्र, अमेरिकेतील इतर राज्यांतील मतमोजणी पूर्ण झाली असून या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. ट्रम्प आता जानेवारीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

तथापि, भारत आणि अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये मूलभूत फरक असा आहे की, अमेरिकेत अजूनही बॅलेट पेपरद्वारे मतदान केले जाते, तर भारताने अनेक वर्षांपूर्वी मतदानासाठी ईव्हीएमची निवड केली आहे. दरम्यान, दुसऱ्या युजरने लिहिले की, भारताने एका दिवसात 640 दशलक्ष मतांची मोजणी केली परंतु कॅलिफोर्निया अजूनही 15 दशलक्ष म्हणजेच 1.5 कोटी मतांची मोजणी करत आहे आणि मतदान संपून 18 दिवस उलटले आहेत. या पोस्टला उत्तर देताना एलन मस्क यांनी लिहिले की, हे खूप दुःखद आहे.

शनिवारी महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आले, येथेही एकाच दिवसात मतमोजणी झाली. भारतीय निवडणूक व्यवस्थेची प्रशंसा करणारे एलन मस्क यावर्षी जुलैमध्ये ईव्हीएमला 'धोकादायक' म्हणत होते. मस्क यांनी तेव्हा म्हटले होते की, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि पोस्टल मतदान 'अत्यंत धोकादायक' असू शकतात त्यास बॅलेट पेपर मतदान आणि प्रत्यक्ष मतदानाने रिप्लेस केले पाहिजे. हे विधान करण्याआधी काही दिवस आधी मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे रद्द करण्यात यावीत, असे म्हटले होते. मानवाकडून किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका कमी आहे परंतु त्याची शक्यता खूप जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

Ashadhi Ekadashi 2025: टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर...आषाढी एकादशीला पंढरपुरात काय-काय करतात?

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

SCROLL FOR NEXT