Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: 'वाटलं तर गवताच्या भाकरी खाऊ...' भुट्टोचे ते विधान आणि आज मुठभर पीठासाठी पाकमध्ये मारामारी

Pakistan: आता पाकिस्तानमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिघडल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan: मागच्या वर्षी श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती वाईट दशेला पोहचली होती. दैनंदीन वस्तूंचे भाव शिगेला पोहचले होते. आता पाकिस्तानमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिघडल्याचे दिसून येत आहे.

पाकिस्तानमध्ये रोजच्या गरजेच्या वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. काही दिवसांपूर्वी एलपीजी प्लास्टिकच्या पिशवीतून मिळत असल्याचे समोर आले होते. याचे कारण म्हणजे एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्याचबरोबर आता अन्नधान्याची टंचाईदेखील निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.पीठाची किंमत 150 रुपए किलो झाली आहे.

दरम्यान सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काही लोक गाडीवरुन पीठाने भरलेल्या ट्रकचा पाठलाग करताना दिसत आहेत. पाकिस्तानचे लोक आक्रमक होताना दिसत आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर उतरुन सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी भारतात सामील होण्याची इच्छादेखील व्यक्त केली जातआहे.

गिलगिट बलुचिस्तानमध्ये हा विरोध तीव्र होताना दिसत आहे. मागच्या 12 दिवसांपासून इथले नागरिक आपला विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन करत आहेत. कारगील गेट खुले करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. लोकांचा असा दावा आहे की,पाकिस्तानी सेना गिलगिट बलुचिस्तानमधल्या वस्तूंवर अवैधपणे कब्जा करत आहे.

दरम्यान, भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला हार पत्कारावी लागल्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री जुल्फीकार अली भुट्टो यांनी भारताला उद्देशून म्हटले होते की पाकिस्तानला गवताच्या भाकरी खाव्या लागल्या तरी चालतील पण पाकिस्तान परमाणू बॉंब बनवल्याशिवाय थांबणार नाही.

पाकिस्तानने परमाणू बॉंब तर बनवला मात्र अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.पाकिस्तानला चीन(China ) , अमेरिका, सौदी अरेबिया, जर्मनी, ब्रिटेन, जपान( Japan ) या देशांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT