Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: इम्रान यांच्या जामिनावर सुनावणीवेळी न्यायाधीशच उठून गेले बाहेर; खान यांनी दिली धमकी...

दुसऱ्या प्रकरणात अटक करण्यासाठी पोलिस सज्ज

Akshay Nirmale

Imran Khan: पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयात अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जामिनावरील सुनावणी थांबली आहे. सुनावणी सुरू होताच खान यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. यामुळे संतापलेले न्यायाधीश कोर्टरूम सोडून बाहेर गेले. शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर सुनावणी पुन्हा सुरू होऊ शकते.

उच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू असताना न्यायालयाबाहेर पंजाब पोलीस आणि रेंजर्सचे पथक इतर चार प्रकरणांमध्ये खान यांना अटक करण्यासाठी उच्च न्यायालयाबाहेर उभे आहे.

इम्रान यांना याचा सुगावा लागताच त्यांनी वकिलाच्या मोबाईलवरून एका पत्रकाराशी बोलताना, आता जर अटकेची कारवाई झाली तर गदारोळ होईल, यासाठी मला जबाबदार धरू नका, अशी धमकीच सरकारला दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अल कादिर ट्रस्ट घोटाळ्यातील इम्रान यांची अटक बेकायदेशीर ठरवत, त्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यांना शुक्रवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून जामीन घेण्याचे सांगण्यात आले होते.

दुसरीकडे, तोशाखाना प्रकरणात खान यांना दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. खरे तर पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने या प्रकरणी फौजदारी खटला चालवण्याची परवानगी मागितली होती.

याविरोधात इम्रानने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने म्हटले आहे की, पुढील आदेशापर्यंत सत्र न्यायालय या प्रकरणी कोणतीही सुनावणी घेणार नाही.

हायकोर्टातील सुनावणीनंतर इम्रान हे इस्लामाबादमधील श्रीनगर हायवेवरून कामगारांना संबोधित करणार आहे. गुरुवारी सुटका झाल्यानंतर खान यांच्या समर्थकांनी देशभर आनंदोत्सव साजरा केला होता. इम्रानची पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथनेही ट्विटरवर आपला आनंद व्यक्त केला आहे.

सुप्रीम कोर्टाने सुटका केल्यानंतर माजी पंतप्रधानांना पोलिस लाईनच्या गेस्ट हाऊसमध्ये नेण्यात आले. खरे तर सुप्रीम कोर्टाने खान यांचे घरी जाण्याचे आवाहन फेटाळून लावले होते आणि त्यांना पोलीस लाईनमध्येच राहावे लागेल असे सांगितले होते. 10 समर्थकांनाही इम्रानसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT