Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

Donald Trump Iran Nuclear Attack Plan: इराणने साठवलेले तब्बल 440 किलो संवर्धित युरेनियम जप्त करुन ते अमेरिकेच्या ताब्यात घेण्याचा ट्रम्प यांचा मानस आहे.

Manish Jadhav

Donald Trump Iran Nuclear Attack Plan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा कायमचा निकाल लावण्याच्या तयारीत असून इराणमधील अणू केंद्रांवर थेट हल्ला करण्याची मोठी योजना आखण्यात आली. इराणने साठवलेले तब्बल 440 किलो संवर्धित युरेनियम जप्त करुन ते अमेरिकेच्या ताब्यात घेण्याचा ट्रम्प यांचा मानस आहे. या मोहिमेसाठी अमेरिकेने 21 युद्धनौका, 3500 मरीन कमांडो आणि 50000 सैनिकांच्या मदतीने इराणला वेढले. आता केवळ ट्रम्प यांच्या अंतिम आदेशाची प्रतीक्षा आहे. मात्र, संरक्षण तज्ज्ञांच्या मते इराणची भौगोलिक परिस्थिती आणि तिथले गुप्त बंकर पाहता हे युरेनियम शोधून ते सुरक्षितरित्या बाहेर काढणे अमेरिकेसाठी अशक्यप्राय आव्हान ठरु शकते.

इराणने आपले 60 टक्के संवर्धित युरेनियम जमिनीखाली शेकडो फूट खोल असलेल्या गुप्त बंकरमध्ये ऑक्सिजन सिलेंडरसारख्या धातूच्या कंटेनरमध्ये लपवून ठेवले आहे. तज्ज्ञांच्या मते, या 440 किलो युरेनियमपासून किमान 10 अणुबॉम्ब तयार केले जाऊ शकतात. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी दावा केला की, अमेरिकेला इराणच्या या गुप्त बंकरची नेमकी माहिती आहे. तरीही, त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सावधगिरीचा इशारा दिला. कारण, या मोहिमेदरम्यान युरेनियम वाहून नेताना जर हल्ला झाला, तर किरणोत्सर्गामुळे (Nuclear Radiation) संपूर्ण आखाती देशांमध्ये विनाश ओढवू शकतो.

या मोहिमेत अमेरिकेसमोर (America) तीन मोठी संकटे आहेत. पहिले म्हणजे, इराणने खर्ग बेटावर जवळपास 1 लाख सैनिक तैनात केले असून अमेरिकेच्या सैनिकांच्या तुलनेत इराणी सैनिकांची संख्या तिप्पट आहे. दुसरे संकट म्हणजे, होर्मुझच्या समुद्रधुनीवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिकेला समुद्रात पेरलेल्या सुरुंगांचा सामना करावा लागेल. इराणने केशम, लार्क, होर्मुझ आणि अबू मुसा यांसारख्या 7 महत्त्वाच्या बेटांवर 10 लाखांहून अधिक सैनिक आणि हजारो 'स्पीड बोटी' तैनात केल्या आहेत. जर अमेरिकेने एका बेटावर हल्ला केला, तर उर्वरित 6 बेटांवरील सैन्य एकत्रितपणे प्रतिहल्ला चढवू शकते.

तिसरे आणि सर्वात मोठे संकट म्हणजे, इराणच्या भूमीवर लष्करी कारवाई केल्यास अमेरिकन सैनिकांना ओलीस धरले जाण्याची दाट शक्यता आहे. इराणचे (Iran) भूमिगत मिसाईल बंकर नष्ट करणे सोपे नाही. या संपूर्ण संघर्षात केवळ अमेरिका आणि इराणच नाही, तर संपूर्ण जगाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. ट्रम्प यांच्या या 'मास्टर प्लॅन'मुळे जागतिक सुरक्षा धोक्यात आली असून इराणनेही 'सरप्राईज अटॅक'ची तयारी केल्याने आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coffee Health Research: रोज कॉफी पिल्यास आयुष्य खरंच वाढतं? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती

Bandoda Jain Settlement: बांदोड्यातील प्राचीन जैन वस्ती आणि विजयनगर साम्राज्याचे सुवर्णयुग

Canacona Mega Housing Project: देळेत गृहनिर्माण प्रकल्पाला तीव्र विरोध; 15 दिवसांत निर्णय न घेतल्‍यास उपोषणाचा इशारा

Hardik Pandya New Look: हार्दिक पंड्याचा नवा अवतार चर्चेत; मुंडण करून महिका शर्मासोबत श्री वेंकटेश्वर स्वामींच्या चरणी नतमस्तक Watch Video

Santa Cruz BJP Office: बाबूश-रुडॉल्फमध्ये शब्दयुद्ध! सांताक्रुझमधील नवे कार्यालयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू

SCROLL FOR NEXT