Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

US Iran Conflict: "इराणला नमतं घ्यावंच लागेल!" ट्रम्प यांचा तेहरानला निर्वाणीचा इशारा; अण्वस्त्रांचा हट्ट सोडल्याशिवाय कोणताही करार नाही

Donald Trump Iran Warning: तेहरानला आता हार मानावीच लागेल, अशा शब्दांत त्यांनी इराणला सुनावले असून अण्वस्त्र निर्मितीची महत्त्वाकांक्षा सोडल्याशिवाय कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यास ट्रम्प यांनी स्पष्ट नकार दिला.

Manish Jadhav

Donald Trump Iran Naval Blockade: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (29 एप्रिल) इराणविरुद्ध सुरु असलेल्या अमेरिकन नौदलाच्या नाकाबंदीचे जोरदार समर्थन करत ही एक "शानदार रणनीती" असल्याचे म्हटले. तेहरानला आता हार मानावीच लागेल, अशा शब्दांत त्यांनी इराणला सुनावले असून अण्वस्त्र निर्मितीची महत्त्वाकांक्षा सोडल्याशिवाय कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यास ट्रम्प यांनी स्पष्ट नकार दिला.

अमेरिकन नौदलाची ही नाकाबंदी 100 टक्के यशस्वी ठरली असून ती अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतीक असल्याचे ट्रम्प म्हणाले. आपल्या पहिल्या कार्यकाळात जगातील सर्वात मोठी सेना उभारल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, सध्या अमेरिकेच्या लष्करी ताकदीच्या आसपासही कोणी नाही. इराणची अर्थव्यवस्था सध्या पूर्णपणे कोलमडली असून त्यांच्याकडे शरणागती पत्करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असेही ट्रम्प यांनी नमूद केले. सध्या दोन्ही देशांमध्ये दूरध्वनीवरुन चर्चा सुरु असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

दुसरीकडे, अमेरिकेच्या (America) या वाढत्या दबावामुळे संतप्त झालेल्या इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याविरुद्ध एका नवीन आणि अनाकलनीय शस्त्राचा वापर करण्याची धमकी दिली. इराणच्या नौदल प्रमुखांनी असा दावा केला की, या नवीन शस्त्राच्या वापरामुळे शत्रू सैनिकांना 'हार्ट अटॅक' येऊ शकतो. अमेरिकेने नाकाबंदी हटवल्यास होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा प्रस्ताव इराणने दिला होता, परंतु ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने इराणने ही आक्रमक पवित्रा घेतला. इराणचे नौदल कमांडर रिअर ॲडमिरल शाहराम इराणी यांनी सरकारी वाहिनीशी बोलताना सांगितले की, तेहरान लवकरच शत्रू सैन्याचा सामना अशा शस्त्राने करेल ज्यामुळे त्यांना मोठा धक्का बसेल.

इराणी तेल व्यापारावर नाकाबंदी घालून इराणला वाटाघाटीसाठी भाग पाडण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या रणनीतीची इराणी यांनी खिल्ली उडवली. अमेरिकेसारख्या शत्रूंना असे वाटते की ते या आक्रमकतेच्या जोरावर इराणकडून अपेक्षित परिणाम साध्य करतील, परंतु हा त्यांचा चुकीचा समज असल्याचे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवत स्पष्ट केले की, जोपर्यंत इराण अण्वस्त्रे न ठेवण्याचे मान्य करत नाही, तोपर्यंत कोणताही समझोता होणार नाही. इराणच्या (Iran) अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट असून ती आता 'मृत अर्थव्यवस्था' झाली, असे टीकास्त्रही ट्रम्प यांनी सोडले. या दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळे आखाती प्रदेशात युद्धाचे ढग दाटले असून जागतिक समुदायाचे या घडामोडींकडे बारकाईने लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

BMW i5 LWB ची भारतात ग्रँड एन्ट्री! एका चार्जमध्ये 669 किमी धावणार, 268 bhp पॉवर अन् लक्झरी फीचर्स मिळणार; किंमत किती? पाहा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT