Donald Trump Case Dainik Gomantak
ग्लोबल

Donald Trump Arrest: डोनाल्ड ट्रम्प यांना अटक झाली अन् अवघ्या 20 मिनिटांत...

Donald Trump Arrest: 2 लाख डॉलरचा बॉंड आणि इतर अटींसह त्यांची सुटका करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Donald Trump Arrest: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना अटक करण्यात आली होती. निवडणुकीत निकाल बदलण्यासाठी फसवणुक केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप होते. इतकेच नाही तर धमकी देणे आणि बनावट कागदपत्रे आता त्यांनी जॉर्जियामध्ये शरणागती पत्करली आहे. अटक केल्यानंतर डोनाल्ड ट्रंप हे जवळपास 20 मिनिटे तुरुंगात होते. मात्र त्यानंतर 2 लाख डॉलरचा बॉंड आणि इतर अटींसह त्यांची सुटका करण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे, या वीस मिनिटात डोनाल्ड ट्रम्प यांना कैद्यासारखी वागणूक दिली आहे. P01135809 हा त्यांना कैदी क्रमांक दिला होता. याबरोबरच त्यांचे फिंगरप्रिंट आणि मगशॉट घेण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची ही माहीती पोलिस रेकॉर्डचा भाग बनले आहेत. फुल्टन काउंटी येथील तुरुंगात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सीएनएनच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

या वर्षातील डोनाल्ड ट्रम्प यांची ही चौथी अटक आहे. मात्र जेल अॅथॉरिटीकडून पहिल्यांदाच ट्रम्प यांचा मगशॉट घेण्यात आला. फुल्टन काउंटी जेलकडून ट्रम्प यांचा मगशॉट प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अमेरिकेतील 2020 च्या निवडणूकीत फेरफार करण्याबाबत या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या वकिलाने 45 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात असलेल्या 41 आरोपांपैकी 13 आरोपांमध्ये ट्रम्प यांचे नाव आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांच्याशिवाय आणखी 18 जणांचा यात समावेश आहे. व्हाइट हाऊस चे माजी चीफ ऑफ स्टाफ आणि नेते रुडॉल्फ गिउलियानी यांच्यावर देखील केस दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मी काहीही चूकीचे केले नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT