Discussion between INDIA-CHINA on LAC issue  Dainik Gomantak
ग्लोबल

एलएसीवरून INDIA-CHINA मध्ये चर्चा, तोडगा निघणार?

बैठकीची झालेली ही 12 वी फेरी होती या बैठकीत विविध मुद्द्यांवरून चर्चा झाल्याचे समोर येत आहे. (INDIA-CHINA)

दैनिक गोमन्तक

भारत आणि चीन(India-China) या दोन्ही देशांमध्ये एक संयुक्त बैठक पार पडली आहे. बैठकीची झालेली ही 12 वी फेरी होती या बैठकीत विविध मुद्द्यांवरून चर्चा झाल्याचे समोर येत आहे. आणि भारत आणि चीनच्या लष्करी कमांडरांच्या(China Army) 12 व्या फेरीनंतर 48 तासांनी दोन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. आणि दोन्ही देशांनी एलएसीवर(LAC) शांतता प्रस्थापित करण्यास सहमती दर्शविली आहे. तसेच या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही देशांच्या सैन्यात उर्वरित वादग्रस्त क्षेत्रापासून मुक्त होण्याबाबत सखोल चर्चा झाली आहे.(Discussion between INDIA-CHINA on LAC issue)

या बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करताना भारत आणि चीनने म्हटले आहे की,दोन्ही देशांनी ओळखले आहे की ही फेरीची बैठक रचनात्मक होती, जेणेकरून परस्पर सामंजस्य आणखी वाढवता येईल. एलएसीचे उर्वरित मुद्दे विद्यमान करार आणि प्रोटोकॉलनुसार त्वरित सोडवण्यावर आणि संवाद आणि वाटाघाटींची गती कायम ठेवण्यावर सहमती झाली आहे.

शनिवारी, पूर्व लद्दाखला(Ladakh) लागून असलेल्या एलएसीवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर म्हणजेच नियंत्रण रेषेवर दुसर्‍या टप्प्यातील चिनी सैन्याच्या मोल्दो गॅरिसनमध्ये भारत आणि चीनच्या लष्करी कमांडर्समध्ये नऊ तासांची बैठक झाली होती .त्यांनंतरच भारत आणि चीनने सोमवारी याबाबत संयुक्त निवेदन जारी केले आहे .

संयुक्त निवेदनात म्हटले आहे की,दोन्ही देशांनी पश्चिम क्षेत्राच्या एलएसीवर स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी प्रयत्न सुरू ठेवण्यास सहमती दर्शविली आहे जोपर्यंत उर्वरित भागात विघटन होत नाही तोपर्यंत एलएसीवर संयुक्तपणे शांतता राखली जाईल.

दरम्यान पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसीवर या वर्षी फेब्रुवारीमध्ये चर्चेचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता .या पहिल्या टप्प्यात दोन्ही देशांच्या सैन्याने पांगोंग-त्सो तलावाच्या उत्तरेकडील फिंगर क्षेत्र आणि दक्षिणेतील कैलास हिल रेंजमधून माघार घेतली होती मात्र गोगरा आणि हॉट-स्प्रिंग सारखे असे अनेक वादग्रस्त क्षेत्र आहेत जिथे गेल्या दीड वर्षांपासून दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये संघर्ष सुरूच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT