Did China plan to use the Corona as a weapon in 2015?
Did China plan to use the Corona as a weapon in 2015? 
ग्लोबल

चीनने 2015 सालीच कोरोनाचा हत्त्यार म्हणून वापरण्याचा विचार केला होता?

दैनिक गोमंतक

चीनच्या (China) वुहान (Wuhan) शहरातील एका लॅबमधून कोरोना (Corona) विषाणू पसरला असल्याचा जगभरातून आरोप केला गेला आहे. त्यातच आता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना व्हायरस बद्दल आजपासून काही वर्षे आधीच म्हणजे 2015 सालचा आरोग्य अधिकाऱ्यांनी लिहिलेले दस्तऐवज समोर आले आहेत. यामधून मिलेल्या माहितीनुसार 2015 सालीच चीनने कोरोना विषाणूला हत्त्यार म्हणून वापरण्याबद्दल विचार झालेला असल्याचे समजते आहे. (Did China plan to use the Corona as a weapon in 2015?)

सार्स कोरोना व्हायरस नव्या युगातील जेनेटिक हत्त्यार बनू शकते. कृत्रिम पद्धतीने बनवलेला हा व्हायरस माणसासाठी जीवघेणा असेल असा उल्लेख त्यावेळीच केला गेला होता. ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तसमूहाने त्यांच्या रिपोर्ट मध्ये असा दावा केला आहे."अन नॅचरल ओरिजिन ऑफ सार्स अँड न्यु स्पेसिज ऑफ मॅनमेड व्हायरस" नामक जेनेटिक बायो वेपन बद्दलच्या या रिपोर्ट मध्ये असे सांगितले गेले आहे की,  जगातील तिसरे महायुद्ध हे बायो वेपन अर्थात जैविक हत्त्याराने लढले जाईल. या दस्तऐवजामध्ये चिनी सेनेचे वैज्ञानिक सार्स कोरोना व्हायरसचा हत्त्यार म्हणून वापर करण्याच्या विचारात असल्याचा उल्लेख केला गेला असल्याचे समजते आहे.

दरम्यान, चीनवर जगभरातून कोरोना व्हायरसच्या निर्मितीचा आरोप होत असताना ही बातमी समोर आल्याने जगभरातून केलेल्या दाव्यांमध्ये सत्यता असल्याचा हा पुरावा होऊ शकतो असे ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटजीक इन्स्टिट्यूटचे कार्यकारी निर्देशक पीटर जेनिंग्स यांनी सांगितले आहे. चिनी वैज्ञानिक या व्हायरसचा जैविक हत्त्यार म्हणून वापर करण्याच्या विचारात होते असेच या दस्तऐवजांमधून स्पष्ट होते असे देखील जेनिंग्स यांनी पुढे सांगितले आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT