Depression Dainik Gomantak
ग्लोबल

5 वर्षांची मुलेही डिप्रेशनने त्रस्त, WHO चा धक्कादायक अहवाल आला समोर

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने मानसिक आरोग्याशी संबंधित एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे.

दैनिक गोमन्तक

Mental Health Problems: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने मानसिक आरोग्याशी संबंधित एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. जगभरातील सुमारे 14 टक्के किशोरवयीन मुले कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावाने ग्रस्त आहेत. याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील 5 ते 9 वयोगटातील 8% मुलांनाही विविध प्रकारच्या नैराश्याने ग्रासले आहे. (depression world 14 percent teenagers child have mental health problems half women stress anxiety disorde)

लहान मुलांनाही तणावाचा सामना करावा लागतो

मात्र, यातील बहुतांश मुलांच्या मानसिक आजाराचे कारण त्यांचे शारीरिक अपंगत्व असल्याचे सांगण्यात आले आहे. 5 वर्षांखालील प्रत्येक 50 मुलांपैकी 1 हा काही अपंगत्वामुळे मानसिक आजाराने ग्रस्त आहे. श्रीमंत देशांतील 15% लोक आणि गरीब देशांतील 11.6 टक्के लोक मानसिक आजाराचे बळी ठरतात.

मानसिक आजाराने ग्रस्त 970 दशलक्ष लोक

2019 च्या आकडेवारीनुसार, 301 दशलक्ष लोकांना चिंतेने ग्रस्त होते, 200 दशलक्ष लोकांना नैराश्य होते आणि 2020 मध्ये, कोरोना महामारीमुळे (Corona epidemic) या संख्येत आणखी वाढ झाली आहे. 246 दशलक्ष लोकांना नैराश्याने ग्रासले आहे. चिंताग्रस्तांची संख्या देखील वेगाने वाढून 374 दशलक्षवर पोहोचली. 1 वर्षात, नैराश्याच्या प्रकरणांमध्ये 28 टक्क्यांनी वाढली असून चिंताग्रस्त प्रकरणांमध्ये 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महिलांना डिप्रेशनचा धोका जास्त असतो

एकूण मानसिक आजारांपैकी 52% महिला आणि 45% पुरुष कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराला बळी पडतात. जगातील 31% लोकांना चिंतेने ग्रासले आहे. या प्रकारचा मानसिक आजार सर्वात व्यापक आहे. 29% लोक डिप्रेशनचे बळी आहेत. 11% लोकांना काही प्रकारचे शारीरिक अपंगत्व असते, ज्यामुळे ते मानसिक आजारी असतात.

आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत

आकडेवारीनुसार, प्रत्येक 100 मृत्यूंपैकी 1 मृत्यू हा आत्महत्येमुळे होत आहे. 2019 मध्ये 7,03,000 लोकांनी आत्महत्या केल्या, म्हणजेच प्रत्येक 1 लाख लोकांपैकी 9 जणांचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला आहे. 58% आत्महत्या वयाच्या 50 व्या वर्षापूर्वी होतात. मानसिक आजाराने ग्रस्त लोक त्यांच्या स्थितीमुळे त्यांच्या सरासरी वयापेक्षा 10 ते 20 वर्षे कमी जगू शकतात.

या कारणांमुळे मुले नैराश्यात असतात

जेव्हा जगभरात वाढलेल्या नैराश्याच्या कारणांवर प्रकाश टाकला गेला तेव्हा असे आढळून आले की, मुलांसोबत लैंगिक अत्याचार नैराश्याचे प्रमुख कारण आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे लोकही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले आहेत.

सामाजिक भेदभाव हे देखील एक मोठे कारण आहे

खराब मानसिक आरोग्याच्या इतर प्रमुख कारणांमध्ये सामाजिक आणि आर्थिक भेदभाव यांचा समावेश होतो. युद्ध आणि आता हवामान संकट हे देखील मानसिक आजाराचे कारण म्हणून पाहिले जात आहे. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, कोरोना महामारीमुळे पहिल्याच वर्षात नैराश्य आणि तणावाच्या प्रकरणांमध्ये 25% वाढ झाली आहे.

मनोरुग्णांना उपचार मिळत नाहीत

अहवालानुसार, मनोविकाराने ग्रस्त असलेल्या 71% लोकांना योग्य उपचार मिळत नाहीत. उपचार घेणार्‍यांपैकी 70% श्रीमंत देशांत राहणारे लोक आहेत. गरीब देशांमध्ये राहणाऱ्या केवळ 12% मानसिक आजारी लोकांना उपचार मिळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT